आम्ही भारत सरकारसाठी काम करतो !; दसॉल्टच्या सीईओंनी राहुल गांधींना सुनावले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |


नवी दिल्ली : राफेल करारावर राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना दसॉल्ट कंपनीचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी चांगलेच सुनावले आहे. राहुल गांधींचे आरोप धादांत खोटे असल्याचे सांगत त्यांनी कॉंग्रेसला चांगलेच फैलावर घेतले. आम्ही कोणत्याही पक्षासाठी नव्हे तर भारत सरकारसोबत काम करतो, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींना सुनावले. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल करारप्रश्नी केंद्र सरकारवर टीका करत होते. त्या पार्श्वभूमीवर एएनआयया वृत्तसंस्थेला एरिक यांनी मुलाखत दिली. त्यावेळी करारातील अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले आहे.

 

ते म्हणाले, राफेल कराराबद्दल मी खोटे बोलणार नाही. मी यापूर्वीही सांगितले होते. तेही खरेच होते. इतक्या मोठ्या कंपनीच्या पदावर असताना खोटे बोलू शकत नाही.संरक्षण क्षेत्रात अनुभव नसताना विमाननिर्मितीचा अनुभव नसताना केंद्र सरकारने रिलायन्सला राफेलचे कंत्राट मिळाल्याचा आरोप राहुल गांधी करत आहेत. त्यावर भूमिका मांडतांना त्यांनी राहुल गांधी यांना चोख प्रत्युत्तर दिले. दसॉल्ट कंपनीने स्वतःहून रिलायन्सची निवड केली आहे.

 

राहुल गांधी यांनी तोट्यात गेलेल्या रिलायन्स कंपनीला दसॉल्टने २८४ कोटी रुपये दिल्याचाही आरोप केला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या आरोपांमुळे आम्ही दुखावलो गेलो आहोत. भारतासोबत आमचा पहिला करार १९५३ साली केला. त्यावेळी कॉंग्रेसची सत्ता होती. आम्ही कोणत्याही पक्षासोबत काम करत नाही. आम्ही भारतासाठी काम केलं आहे. भारताच्या हवाईदलाला आम्ही शस्त्रपुरवठा केला आहे.

 

राफेल काराराबाबत माहिती देताना ते म्हणाले, राफेल कराराअंतर्गत ३० कंपन्यांशी सौदा झाला आहे. ऑफसेट कंपन्यांचा सहभाग हा ४० टक्के असणार आहे. त्या ४० टक्क्यांपैकी केवळ १० टक्के वाटा हा रिलायन्स समुहाचा आहे. त्यामुळे राहुल गांधींनी ज्या प्रमाणे आरोप केले आहेत. त्याचे आम्हाला दुःख आहे.  

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@