‘मणिकर्णिका’चा टीझर प्रदर्शित

    03-Oct-2018
Total Views | 16

 


 
 
मुंबई : कंगना रनोटचा बहुचर्चित सिनेमा ‘मणिकर्णिका’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातील कंगनाच्या लूकची गेल्या बऱ्याच काळापासून चर्चा होती. कंगनाने या सिनेमात झाशीची राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली आहे. ‘मणिकर्णिका’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या २४ तासांमध्ये तो १ कोटी जणांनी पाहिला. सिनेमाच्या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.
 
 
 

 

‘मणिकर्णिका’ पुढल्या वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. ‘मणिकर्णिका’चा हा टीझर काहींच्या पसंतीस उतरलाय तर काहीजणांनी त्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. आधी सोनू सूद व त्यानंतर सिनेमातील आणखी एका अभिनेत्रीने हा सिनेमा सोडल्यामुळे कंगनाच्या अडचणी वाढल्या होत्या. परंतु अखेर सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून त्याचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. आता मणिकर्णिकाची जादू बॉक्स ऑफिसवर चालते का? हे पाहण्यासाठी कंगनाच्या चाहत्यांना थोडी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121