नवी दिल्ली : राफेल डील प्रकरणी देशभरात आरोपप्रत्यारोप होत असताना, केंद्र सरकारने याप्रकरणाची संपूर्ण माहिती सुप्रीम कोर्टात सादर केली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणी केंद्र सरकारकडून संपूर्ण माहिती मागवली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात २९ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
फ्रान्स सरकारसोबत भारत सरकारची राफेल डील झाली होती यावरून देशात मोठा वादंग उठला होता. तसेच विरोधकांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप देखील केले होते. यावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे माहिती मागवली होती. केंद्राने कोर्टाच्या आदेशाचे पालन करत बंद लिफाफ्यातून राफेल डील प्रकरणाची गोपनीय माहिती कोर्टाकडे पाठवली.
दरम्यान, खरेदी केलेल्या लढाऊ विमानांची तांत्रिक माहिती व किंमतीचा उल्लेख करण्याची आवश्यकता नसल्याचे देखील या खंडपीठाने म्हटले होते. त्यामुळे आता २९ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/