"पर्यटनवृद्धीने जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2018
Total Views |


 


नाशिक: नाशिक जिल्ह्याचे पर्यटन वाढावे यासाठी काही नवीन उपाययोजना होणे हे अत्यावश्यक होते. अनरेव्हलनाशिक. कॉम हे संकेतस्थळ नाशिकची अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी जिल्ह्याची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी संकेतस्थळाची आवश्यकता होती, पर्यटनवृद्धीने नाशिक जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ‘हॉटेल ताज गेट वे’ येथे आयोजित संकेतस्थळ अनावरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून या संकेतस्थळाची निर्मिती झाली असून या संकेत स्थळावर नाशिक म्हणजे काय? तेथे कसे जावे? काय पहावे? काय प्रसिद्ध आहे आदी माहिती एकाच पोर्टलवर जिल्हा प्रशासन व एमटीडीसी यांच्या माध्यमातून उपलब्ध केली आहे.

 
यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणले की, “जिल्हाप्रशासानाचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. आपल्या राज्यात अनेक जिल्हे हे पर्यटनाने समृद्ध आहेत. राज्यासह जगातील नागरिकांना ते माहिती होणे आवश्यक आहे. त्यमुळे तेथे वर्दळ वाढेल आणि वर्दळ वाढल्यास तेथे शासनालाही सोयी सुविधा करता येतील. त्यमुळे पर्यटन वृद्धी हे एक प्रकारे विकासाचे द्योतक आहे. असे पाटील यांनी यावेळी सांगितले. नाशिकच्या या उपक्रमाची प्रेरणा घेऊन कोल्हापूरमध्येही असे संकेतस्थळ सुरु करण्याचा मानस पाटील यांनी यावेळी बोलून दाखविला तसेच त्यांनी याप्रसंगी आडवाटेचे कोल्हापूर या संकल्पनेची सोदाहरण माहिती उपस्थिताना दिलीयावेळी मनोगत व्यक्त करताना गिरीश महाजन म्हणले की, या कार्यक्रमाचा खर्च हा विविध संस्थांनी केवळ नाशिकवरील प्रेमापोटी ‘सीएसआर’च्या माध्यमातून उचलला आहे. पर्यटनाला चालना देणारे आणि सर्वंकष माहिती उपलब्ध करून देणारे असे हे देशातील पहिले संकेतस्थळ आहे. आजमितीस आपण विश्व पर्यटनाला जाने पसंद करतो कारण तेथील सर्व माहिती आपल्याला घर बसल्या मिळते. तशीच माहिती या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याने भविष्यात नाशिकच्या पर्यटनाला नाकीच चलना मिळेल असा विश्वास महाजन यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
 

जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संकेतस्थळ निर्मिती मागचा प्रवास व त्यासाठी केलेले प्रयत्न यांची विस्तृत माहिती दिली. तसेच त्यांनी यावेळी सांगितले की पर्यटन वृद्धी सोबत अर्थ वृद्धी व्हावी नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी होम स्टेज ची संकल्पना देखील जिल्हा प्रशासन राबवीत आहे. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील ३०४० नागरिकांना रोजगार आजमितीस उपलब्ध झाला आहे. तसेच हे संकेस्थळ पाहण्यसाठी कोणताही प्रकारचे एप डाउनलोड करण्याची आवश्यकता नसून केवळ २ जी जोडणीवर देखील हे संकेतस्थळ पाहता येणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी यावेळी सांगितले. या संकेतस्थळासाठी यात्रा, क्रेडाई, झूम कार्स यांचे सहकार्य लाभले आहे. यावेळी आयरमन किताब पटकाविल्याबद्दल पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@