अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डींग्ज, पोस्टर्स आदी संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्र वगळता जिल्ह्यातील अन्य क्षेत्राकरीता तालुकास्तरावर निवासी नायब तहसिलदार यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.
उच्चन्यायालयाच्या निर्देशानुसार सदर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्र. १५५/२०११ प्रकरणी दिनांक ३१/१/२०१७ रोजी दिलेल्या आदेशानुसार
महानगरपालिका/ नगर परिषद/ नगर पंचायत हे नागरी/ शहरी क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनधिकृत जाहिराती,
घोषणा फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स इ. संदर्भात करावयाच्या तक्रारीबाबत तक्रार निवारण यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील नोडल अधिकारी म्हणून नियूक्त केलेल्या नायब तहसिलदारांची तालुकानिहाय नावे व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
नाशिक तालुका ए.डी.शेवाळे (0253-2575663)
दिंडोरी- श्रीमती पी.के. टाकळे(2557-221003)
इगतपुरी-एस.एन.शिंदे (02553-244009)
पेठ-एच. एन. झिरवाळ (02558-225531)
त्रंबकेश्वर-एम.पी.कनोजे (02594-233355)
निफाड-संघमित्रा बाविस्कर (02550-241024)
येवला-एस. ए. पठारे (02559-265005)
सिन्नर-डी.वाय.वायचळे (02551-220028)
मालेगांव-वसंत पाटील(02554-254732)
चांदवड-आर.व्ही.सुराणा (02556-252231),
नांदगांव श्रीमती एस.एस.बैरागी (02552-242232)
कळवण- ममता भंडारे (02592-221037)
सुरगाणा- एस.आर.बकरे (02593-223323)
बागलाण-ए.ए.तांबे (02555-223038)
देवळा- ए.आर.चव्हाण (02592-228554).