काल भारत व श्रीलंका यांच्यात दुसरा टी-२० सामना झाला. दुसऱ्या सामन्यातही भारताने वर्चस्व राखत लंकेवर दणदणीत विजय मिळवला. या विजयात भारताचा कर्णधार रोहित शर्माने केलेल्या परीचे मोलाचे योगदान आहे. रोहितने अक्षरशः लंकेच्या गोलंदाजांना घाम आणला व मैदानात चहूबाजूला फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला. अवघ्या ३५ चेंडूत रोहितने १०१ धावा करत टी-२० मध्ये वेगवान शतक करणाऱ्या डेव्हिड मिलरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली.
रोहितची तुफानी शतकी खेळी पाहण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा
जगातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीला पुन्हा पुन्हा पहावीशी वाटेल अशीच धडाकेबाज खेळी रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात केली. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने २३ चेंडू खर्च केले. २३ चेंडूत त्याने ५३ धावा केल्या तर पुढच्या सात चेंडूंमध्ये त्यानी २० धावा केल्या (३० बॉल ७३). याचाच अर्थ पुढच्या केवळ पाच चेंडूंत त्याने २८ धावांची बरसात करत शतक साजरे केले (३५ बॉल १०१). शतक पूर्ण केल्यावर मात्र त्याच्या धावांचा ओघ थोडासा कमी झाला व अखेरीस ४३ चेंडूत १२ चौकार व १० षटकारांच्या सहाय्याने रोहितने ११८ धावा जमविल्या. रोहित बाद झाला तेव्हा भारतीय संघाच्या १२. षटकात १६५ धावा झाल्या होत्या.