सध्या सर्वत्र गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरण चांगलेच गाजत आहे. 1,039 कोटींच्या या घोटाळ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे नाव आल्याने या घोटाळ्याने राजकीय वर्तुळात एक वेगळाच भूकंप केला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ‘ईडी’च्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या ‘गुरु आशिष कन्स्ट्रक्शन’ कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला. या घोटाळ्यामुळे अनेक नागरिक अ
Read More
"केंद्रीय यंत्रणांचा वापर करून फक्त शिवसैनिकांनाच लक्ष्य केले जात आहे, मराठी अस्मिता, विरोधी आवाज दडपून टाकण्याचा हा भाजपचा डाव आहे" असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर रविवारी ईडीकडून कारवाई सुरु झाली. ईडीकडून संजय राऊतांना ताब्यात घेण्यात आले आहे. येथून त्यांची पुढची चौकशी सुरु होईल. यातच अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी एक सूचक विधान केले आहे
शिंदे गट , भाजप यांच्यावर सातत्याने तोंडसुख घेण्यात मग्न असणारे आणि महाविकास आघाडीचे स्वयंघोषित प्रवक्ते शिवसेना नेते संजय राऊत त्यांचा तकलादू शूरपणा त्यांच्याच अंगलट आला आहे
गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर ईडीने ताब्यात घेतले आहे. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली केली आहे
गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात १ हजार ३४ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर रविवारी सकाळी ईडीची धाड पडली. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशी नंतर ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतले आहे
पत्राचाळ प्रकरणातील हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत ईडीच्या ताब्यात गेल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिंतेत पडले असणार की आता आपला एकमेव मुलाखतकार तर गेला आता मुलाखत घेणार कोण ? अशी बोचरी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला असतानाच, संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.