संजय राऊतांचा मला अभिमान आहे! उद्धव ठाकरे

    01-Aug-2022
Total Views |
 

thakre

 
 
मुंबई : "केंद्रीय यंत्रणांचा वापर करून फक्त शिवसैनिकांनाच लक्ष्य केले जात आहे, मराठी अस्मिता, विरोधी आवाज दडपून टाकण्याचा हा भाजपचा डाव आहे" असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आता तुमची वेळ आहे, उद्या कदाचित आमची वेळ असेल आणि तेव्हा तुम्हांला तुम्ही वागला आहेत त्यापेक्षा जास्त वाईट वागणूक मिळेल असा इशारा देण्याचे कामही उद्धव ठाकरेंनी केले.
 
संजय राऊतांची जोरदार पाठराखण करत त्याने अन्यायाविरुद्ध उभे राहून इतरांना लढण्याची प्रेरणा दिली आहे असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. संजय माझा जुना मित्र असून त्याचे माझे कौटुंबिक संबंध आहेत. तो कट्टर शिवसैनिक आहे आणि तो शेवटपर्यंत लढताच राहील अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या बाजूनेच आपण आहोत हेच ठासून सांगितले.
 
 
देशात पुन्हा एकदा आणीबाणीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. आता सर्व विरोधकांनाही आता लोकशाही वाचवण्यासाठी, भाजपला रोखण्यासाठी मैदानात उतरावे लागेल असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले. भारतातसध्या जी राजवट आहे ती हुकूमशाही राजवट आहे , फक्त मराठी माणसांमध्ये, हिंदूंमध्ये फूट पडायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असाच भाजपचा डाव आहे.