पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संपूर्ण राज्य हादरले असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान, गुरुवार, २४ एप्रिल रोजी या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला आहे.
Read More
विविध कारणांमुळे भारतात गेल्या वर्षभरात तब्बल ८४ वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आले होते. यामुळे तब्बल साडेचार हजार कोटींचा आर्थिक फटका बसल्याचे नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ठाणे शहरातील प्रत्येक भागात दर १५ दिवसांतून एक दिवस १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ‘झोनिंग’ पद्धतीने पाणीपुरवठाकरण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली.
‘स्टेम वॉटर डिस्ट्री. अॅण्ड इन्फा. कं. प्रा. लि.’ यांच्यावतीने पावसाळ्याअगोदर दैनंदिन देखभाल-दुरूस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत.
डोंबिवली ‘एमआयडीसी’ भागात अनियमितपणे होणार्या पाणी पुरवठ्याविरोधात आणि ‘शटडाऊन’ काळात जाहीर केलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ पाणीपुरवठा बंद ठेवल्याविरोधात नागरिकांनी ‘एमआयडीसी’ कार्यालयावर सोमवारी धडक देत अधिकार्यांना जाब विचारला.
‘स्मार्ट सिटी’चा दावा करणार्या ठाणे शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून ‘येनकेन’प्रकारे पाणीपुरवठ्याचे रडगाणे सुरूच आहे. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणार्या ‘स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन’कंपनीच्यावतीने माणकोली एम.बी.आर येथे स्टेमच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती काढण्यात येणार असल्याने ‘झोनिंग’ पद्धतीने पाणी पुरवले जाणार आहे
भामरागड तालुक्यात लाहेरी मार्गावरील मलमपडूर भागात नक्षलवाद्यांनी बॅनरबाजी केली आहे. येथून काही अंतरावर असलेल्या जुव्वी नाल्याजवळही एक बॅनर लावले आहे. या भागात काही पत्रकेही टाकण्यात आली आहेत.
राष्ट्रवादाची ही चेतना केवळ ब्रिटन वा अमेरिकाच नव्हे तर फ्रान्स, हंगेरीसह अनेक युरोपीय देशांत निर्माण झाल्याचे गेल्या काही काळातील घटनांवरून दिसते. एरवी उदारतेचा, सर्वसमावेशकतेचा दावा करणार्या युरोपीयन देशांवरही स्वतःपुरते पाहण्याची वेळ आणली ती अरब आणि आखाती देशातील मुस्लीम निर्वासितांनी.