ठाणे शहरात पाणीबाणी

पंधरवड्यात १ दिवस १२ तास पाणीपुरवठा बंद

    15-Jun-2022
Total Views |

thane
 
 
 
 
ठाणे : ठाणे शहरातील प्रत्येक भागात दर १५ दिवसांतून एक दिवस १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ‘झोनिंग’ पद्धतीने पाणीपुरवठाकरण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये भातसा धरणातून उपलब्ध होणारा पाणीपुरवठा, पिसे पम्पिंग स्टेशन व टेमघर जलशुद्धीकरण केंद्र तसेच स्टेम प्राधिकरण योजनेमधील होणारे तांत्रिक बिघाड, गळती, वीजपुरवठा खंडित होणे. तसेच, ‘शटडाऊन’ या कारणांमुळे शहराला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
 
 
 
परिणामी शहरातील काही भागांत कमी दाबाने व अपुर्‍या प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त होत आहेत. यावर उपाययोजना म्हणून मुख्य वितरण व्यवस्थेमध्ये पाण्याचा दाब संतुलित ठेवण्यासाठी उपलब्ध पाणी पुरवठयाच्या नियोजनाचा भाग म्हणून ‘झोनिंग’पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच, दि. १५ जून रोजी सकाळी ९ ते दि. १६ जून रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतही ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, शहरातील प्रत्येक भागात दर १५ दिवसांतून एक दिवस १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.