तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रृत घैसास यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार धरत त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Read More
यापुढे तनिषा भिसे प्रकरण घडू नये यासाठी कायदेशीर कारवाई करणार आहे, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात मृत्यू अन्वेषण समितीचा चौकशी अहवाल सादर केला आहे. या प्रकरणातील तिन्ही अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आले असून यापुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत सर्वत्र संतापाचे वातावरण असताना आता धर्मादाय रुग्णालयांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे 'धर्मादाय' असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेत उपचार न केल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, शिवसेनेकडून भिसे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली होती. परंतू, भिसे कुटुंबियांनी ती मदत नाकारली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांना पाच तास थांबवून ठेवले आणि त्यांना १० लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे या घटनेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याने राज्यभरात एकच खळबल उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल पुढे आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत या अहवालाती ठळक बाबींवर भाष्य केले.
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली दुकान उघडलेल्या डॉक्टरांच्या लालसेमुळेच दोन लेकरे जन्मत:च आईच्या मायेला पोरकी झाली, अशा शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेवर संताप व्यक्त केला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेने जीव गमावला असून राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची गंभीर दखल घेतली असून या घटनेच्या चौकशीसाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या (पुणे) अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेशी संबंधित लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी शुक्रवार, ४ एप्रिल रोजी केली.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२व्या पुण्यतिथीनिमित्ताने २४ एप्रिल २०२४ रोजी दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, अनेक दिग्गजांच्या यादीत अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) याच्या गालिब नाटकाचा देखील विशेष सन्मान करत मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना चिन्मय (Chinmay Mand
महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf) यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २४ एप्रिल रोजी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, यावेळी लता मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना देण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी मायबाप रसिक प्रेक्षकांचे आभार मानत हा तुम्हा सर्वांचा सन्मान आहे असे म्हटले.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांना दिल्या जाणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा १६ एप्रिल रोजी मुंबईत करण्यात आली आहे. यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना जाहिर झाला आहे. मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लता मंगेशकर आणि दीनानाथ मंगेशकर पुरस्करांची घोषणा करण्यात आली.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून १० जानेवारीपासून सुरु झालेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवन चरित्र स्पर्धेची १७ जानेवारी रोजी सांगता झाली. आज पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. मुंबईतील ११४८ शाळांमध्ये हि स्पर्धा घेतली घेली. ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक होती आणि यामध्ये १ लाख २० हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या नावे देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले. यावर्षीचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार देशासाठी महत्वाचे योगदान दिलेल्या एकाच व्यक्तीला दिला जातो. उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत आदिनाथ मंगेशकर यांनी पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली.
माझ्या पक्षात मला काय स्थान होते, हे विचारा कुणाला पण. वांद्य्राच्या साहेबांना भेटण्याचे भाग्य सगळ्यांनाच मिळत नव्हते. तेव्हा, शंकराच्या पिंडीआधी नंदी तसा मी होतो. केवढे माझे महात्म्य! कोरोना काळात तर ‘मुझको देखोगे जहा तक मुझको पाओगे वहा तक मै ही मैहू मै ही मै था.’ आता काय? डॉक्टर एकनाथ शिंदे? माझे स्वप्न असे अचानक तोडून मोडून टाकणार्या आणि मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंना ‘डॉक्टर’ पदवी मिळाली. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे बरं का?
पहिला ‘लता मंगेशकर पुरस्कार’ नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याने अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला. आक्षेप घेणार्यांमध्ये राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आघाडीवर असल्याचे दिसून आले. त्यांनी ट्विटरवरून आपल्या शाब्दिक बाणांनी नको नको ते सल्ले आणि ज्ञान पाजळले
गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिला लता मंगेशकर पुरस्कार सोहळा रविवारी षण्मुखानंद सभागृहात होणार आहे
भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकरांच्या नावाने दिलेला जाणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना दिला जाणार आहे. या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधानांनी लता मंगेशकरांच्या आठवणी जागवल्या
भारतरत्न, गानकोकिळा लाट मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. गायनाच्या क्षेत्रात स्वतः अढळ स्थान तयार करून कित्येक दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य त्यांनी गाजवले. इंदूरचा जन्म असलेल्या लता दीदींच्या गायन प्रवासाला बालपणापासूनच सुरुवात झाली
वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर शास्त्रीय संगीत, नाट्य संगीतात काम करत असूनही लतादीदींनी सिनेसंगीताची निवड केली व त्यातच त्या पुढे गेल्या. भाषा कोणतीही असो, संगीतप्रेमींना त्या आपल्या दैवी आवाजाची अनुभूती देत राहिल्या. मराठी भाषिक असूनही लतादीदींनी हिंदी चित्रपटांत सर्वाधिक गाणी गायली आणि अमराठी जनमानसावरही आपल्या सुरेल आवाजाने अधिराज्य गाजवले.
वृत्तपत्र पत्रकारितेसाठी दै. सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही पुरस्कार
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकृष्ण पुरुषोत्तम तथा राजाभाऊ जोशी यांचे वृद्धापकाळाने पुणे येथे सोमवारी रात्री दीड वाजता निधन झाले. श्वास घेण्यास त्रास जाणवल्यामुळे त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.