मुंबई: गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिला लता मंगेशकर पुरस्कार सोहळा रविवारी षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. पंतप्रधान मोदी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या पुरस्कार सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. जम्मू आणि काश्मीर मधील आपल्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मुंबईकरिता रवाना होणार आहेत.
लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची रविवारी ८०वी पुण्यतिथी आहे. दरवर्षी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा संपन्न होतो. यावर्षीपासून या पुरस्कारांबरोबर लता मंगेशकर पुरस्कारसुद्धा दिले जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.