Sanjiv Puri has projected a growth rate of 6.5 percent This projection is a reflection of the strong fundamentals, policy clarity and collective will of the Indian economy भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी आर्थिक वर्ष 2025-26साठी 6.5 टक्के दराने भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. व्यक्त केलेला हा अंदाज म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बळकट पायाचे, धोरणात्मक स्पष्टतेचे आणि सामूहिक इच्छाशक्तीचे मूर्त रूपच. सध्याची जागतिक स्तरावरील अनिश्चितता, व्यापार संघर्ष, जागतिक अर
Read More
आपल्यासाठी पक्षादेश शिरसावंद्य असून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने ही जागा शिवसेनेलाच जाईल. याठिकाणी आपण स्वतःच प्रमुख दावेदार असल्याचे सूतोवाच आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींकडून त्यांचा मतदारसंघ हिसकावून घेतल्यानंतर, भाजपने आपले पुढचे लक्ष्य केरळमधील वायनाड जिंकण्याकडे वळवले आहे. जो सध्याचा राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे. केरळमधील भाजपची आणि त्यांच्या मित्रपक्षाची एकूण ताकद आणि वायनाडमधली भाजपची २०२४ साठीची रणनीती याचा घेतलेला हा आढावा...
गायन, वाद्य यंत्रांचा आवाज अन् यावर थिरकणारा सहा हजार लोकांचा प्रेक्षक वर्ग. हे दृश्य होतं, मॉस्कोपासून अवघ्या २० किमी दूर असलेल्या क्रोकस सिटी हॉलचं. सर्वकाही सुरळीत चालू असताना अचानक क्रोकस सिटी हॉलमध्ये आगीचा आगडोंब उसळला. या आगीपासून वाचण्यासाठी हॉलमध्ये बसलेले लोकं बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतात. त्याचवेळी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला जातो. आपला जीव वाचवण्यासाठी लोकं मिळेल तो आसरा घेण्याचा प्रयत्न करतात. पण, चार हल्लेखोरांच्या बंदुकीपुढे त्यांचा निभाव लागणं कठीण. या हल्लेखोरांच्या गोळीबारात आतापर्य
ज्या संस्काराने संतती ही बलशाली, शक्तीयुक्त व आरोग्यसंपन्न बनते, तो संस्कार म्हणजे पुंसवन संस्कार! काहीजण पुंसवन संस्काराला पुत्राच्या म्हणजेच मुलाच्या निर्मितीचा संस्कार मानतात. पण, त्यांचा हा गैरसमज आहे. ‘पुंमान्’ म्हणजे पुत्र नसून पुरुषत्त्वाने, शरीराने बलशाली असा शिशु! गर्भस्थानी पुत्र असो वा कन्या, त्यांच्या पौरुषत्व वाढीसाठी व शरीरबळ विकासाकरिता व्रतस्थ होण्याचा संस्कार!
अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे. आपण सर्वजण मिळून त्यांना मदत करू, असे उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम २६० अन्वये राज्यातील कृषी क्षेत्र आणि पूरपरिस्थिती यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते.
मोदी सरकारच्या गरीब कल्याण कार्यक्रमामुळे शोषित, वंचितांना मिळाले संरक्षण मिळाले आहे असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस,आ.देवयानी फरांदे यांचे प्रतिपादन आ.देवयानी फरांदे यांनी केले.
कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, ९ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन, ३ कोटीहून अधिक नागरिकांना मालकीचे घर देणे, ४१ कोटींहून अधिक जनधन खाती या सारख्या योजनांतून मोदी सरकारने गरीब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे अंमलात आणल्याने शोषित, वंचित वर्गाला संरक्षण मिळाले आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकार परिषदेत केले.
“समाजाचे प्रत्येक अंग आज स्वस्थ नाही. त्यामुळे समाजाचे प्रत्येक अंग स्वस्थ बनून समाज सशक्त करणार्या कार्यास बळ देणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शुक्रवारी केले. हडपसरमधील ‘महाराष्ट्र आरोग्य मंडळा’च्या ‘डॉ. दादा गुजर माता-बाल रुग्णालया’चे उद्घाटन डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ उद्योगपती आणि ‘भारत फोर्ज’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी, त्यांच्या पत्नी सुनीता कल्याणी, महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस
यापूर्वीच्या लेखांमधून कोरोनाकाळातील कार्यपद्धती, विविध कंपन्यांनी यादरम्यान अमलात आणलेली कार्यशैली, मनुष्यबळाचे यशस्वी व्यवस्थापन यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांना या स्तंभातून आपण स्पर्श केला. आजच्या भागात कोरोनानंतरच्या काळातील ऑफिस, कर्मचार्यांची मानसिकता, कार्यपद्धती यांचा विचार करुया.
‘मिलिटरी डायरेक्ट’ वेबसाइटने केलेल्या अध्ययनानुसार जगात सर्वांत सामर्थ्यवान लष्करामध्ये चीनचा प्रथम क्रमांक आहे, तर भारतीय लष्कर या क्रमावारीत चौथ्या स्थानी आहे.
आपण ठाम आणि खंबीर व्हायचे ठरविले तर ते शक्य आहे का? अगदी शक्य आहे. खंबीर राहण्यामध्ये आपल्याला अशा अनेक गोष्टींचा लाभ होतो की, ज्यामुळे आपण आपल्या आयुष्याच्या पथावर अनेक लोकांबरोबर चालत असताना, आपल्या मनाला जे खरोखर वाटते, ते बोलू शकू. आपल्या आयुष्याला संपन्न करण्यासाठी लागणार्या कृती करू शकू.
कुर्हाड गावासाठी बिल्दिधरणातून मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना सुरू करुन तेथून पाणी घ्यावे. कोकडी ( म्हसाळा) धरणातून पाणी घेतल्यास होणार्या परिणामांना शासन जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.