रणवीर सिंहच्या वाढदिवसाच्या दिवशीच ‘धुरंधर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ फेम दिग्दर्शक आदित्य धरच्या या बिग बजेट अॅक्शनपटात रणवीरचा एक वेगळाच, अत्यंत रग्गड आणि ओळखू न येण्यासारखा लूक समोर आला आहे.
Read More
महाराष्ट्राच्या मातेचा सिंहासनी राजा, छत्रपती शिवाजी महाराज आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर साजरे होणार आहेत, पण यावेळी एका वेगळ्याच दृष्टिकोनातून! महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित आणि सिद्धार्थ बोडके अभिनित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्याने अक्षरशः मनात वादळ उठवलं आहे.
चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन २१ एप्रिल १९१३ रोजी गिरगाव येथील ऑलिम्पिया थिएटर येथे झाले होते. त्या घटनेला ११२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'चित्रपताका' या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. तसेच, तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार असल्
केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा चित्रपट चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांचे भरभरुन कौतुक मिळवताना दिस आहे. इतकेच नव्हे तर बॉक्स ऑफिसवरही कोटींच्या घरात कमाई करताना दिसत आहे. बाईपण भारी देवा चित्रपट पाहायला चित्रपटग़हात अजूनही गर्दी होत असल्यामुळे तिकीटं मिळत नसल्याने प्रेक्षकांचा हिरमोडही झालेला दिसून येत आहे. ज्यांना बाईपण भारी देवा चित्रपट अजूनही पाहायला मिळाला नाही त्यांच्यासाठी विशेष शो चे आयोजन शुक्रवार दि. २८ जुलै रोजी करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिव चित्रपट सेनेची नुकतीच स्थापना झाली. दरम्यान, या शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार आणि सिने आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टी व कलाकारांच्या अनेक अडचणींबद्दल चर्चा केली. अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली असून केवळ टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या कलावंतांना ९० दिवसांनी मानधन मिळते ते ३० दिवसांच्या आत दिले गेले पाहिजे अशी प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
‘भारतमाता सेवा प्रतिष्ठान’ने भांडुपमध्ये तर विश्व हिंदू परिषद आणि महाराज अग्रसेन सेवा संस्थेने घाटकोपरमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे विनामूल्य प्रक्षेपण नुकतेच केले होते. त्यानिमित्ताने ‘द काश्मीर फाईल्स’ आणि प्रेक्षक यांच्यातले नेमके भावनिक बंध टिपण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात काही...
बॉलीवूड अभिनेता आमिर खान याच्या घरी काम करणाऱ्या सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आमिरचे दोन सुरक्षारक्षक, स्वयंपाकी आणि कारचालक अशा एकूण सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमिरच्या घरी राहणाऱ्या या सातही जणांची काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात या सर्व जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज भारतीय चित्रपट महामंडळाच्या नव्या वास्तूचे उदघाटन पुणे येथे केले.
राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि विशेष योगदान पुरस्कार आज प्रदान करण्यात आले