आमिर खानच्या घरातील सात जणांना कोरोना

    30-Jun-2020
Total Views |
amir khan_1  H




मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खान याच्या घरी काम करणाऱ्या सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आमिरचे दोन सुरक्षारक्षक, स्वयंपाकी आणि कारचालक अशा एकूण सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमिरच्या घरी राहणाऱ्या या सातही जणांची काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात या सर्व जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.



मुंबई महापालिकेने आमिरच्या घरातील सर्वांनाच क्वारंटाईन केले आहे, तसेच त्याचे वाहनही निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. आमिरने पालिका कर्मचाऱ्यांचे याबद्दल आभार मानले आहेत. राज्यात अनलॉक १ ची प्रक्रीया सुरू झाली आहे. कोरोनाच्या काळातही काळजी घेऊन सिनेमा चित्रिकरणाला परवानगी देण्यात आली होती. त्यादृष्टीने आमिरही चित्रिकरणासाठी काही दिवस रवाना होणार होता मात्र, कोरोनाचा शिरकाव घरात झाल्यानंतर त्याला क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. दरम्यान, आमिर खानची प्रकृती सध्या स्थिर असून गरज भासल्यास त्याचीही कोरोना चाचणी केली जाणार असल्याचे समजते.