घरात ठेवलेल्या रेबोल्ड कंपनीच्या ई-बाईकच्या लिथियम बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कळव्यात घडली. हा स्फोट इतका जबरदस्त होता की या घटनेत घराची भिंत व पत्रे कोसळल्याने लाल बादशाह (६६),मेहबूबी लाल बादशहा (५६) या दांम्पत्यासह कुसुमदेवी विश्वनाथ गुप्ता (२८) असे तिघे जण जखमी झाले.सर्व जखमींना उपचारार्थ कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read More
लिथीयम आयन बॅटरी बनवणारे व पुनर्वापर (रिसायकलिंग) करणारी कंपनी लोहम (Lohum) कंपनीने आपल्या विस्तारीकरणासाठी ४५० कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून उभे केले आहेत.सिरिज बी फंडिगअंतर्गत हा निधी बुधवारी कंपनीने मिळवलेला आहे.
ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या प्रिमिअम इलेक्ट्रिक वेईकल उत्पादक कंपनीने तिच्या मॉडेल्समधील बॅटऱ्यांकरिता एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्राम लाँच करत ग्राहकांसोबतचे संबंध अधिक दृढ केले. १ मार्च २०२४ पासून ओडीसी उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक मॉडेल्सवर जवळपास ५ वर्षांपर्यंत एक्स्टेण्डेड वॉरंटीमधून फायदा मिळू शकतो.
इलेक्ट्रिक बस, बाईकला गेल्या काही दिवसांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बॅटरी सर्टिफिकेशन केले जाणार आहे. बॅटरी सर्टिफिकेशन करण्याचे नियम बदलण्यात आले असून, एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसच्या बॅटरीला ‘आयकॅट’ या नोंदणी संस्थेकडून नवीन कोड देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता एसटीच्या ताफ्यात १५० नव्या कोऱ्या ई-बसेस दाखल होणार आहेत.
आयआयटी मंडीमधील दोन संशोधकांनी अतिशय कमी किमतीत सौर बॅटरीची निर्मिती करणारे तंत्र विकसित केले आहे. याद्वारे भारताच्या नवीकरणक्षम उर्जेस प्रोत्साहन देण्याच्या धोरणास बळ मिळणार आहे.
नुकतीच बार्सिलोनामध्ये मोबाइल वर्ल्ड काँग्रेसला (MWC) सुरुवात झाली. हा कार्यक्रम २७ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. GSMA (Groupe Speciale Mobile Association) यांच्यामार्फत दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये सुरु होणाऱ्या या भव्यदिव्य कार्यक्रमामध्ये मोबाइल आणि त्यासंबंधित उपकरणे तयार करणाऱ्या जगभरातल्या कंपन्या उपस्थित असतात. MWC च्या पूर्वसंध्येला नोकिया कंपनीने एक मोठी घोषणा केली.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसइ) नवनिर्वाचीत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आशिष कुमार चौहान यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी कामकाज सांभाळणारे विक्रम लिमये यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ १६ जुलै रोजी संपल्याने सेबीकडून हा निर्णय रविवारी (दि. १७ जुलै) घेण्यात आला. सोमवारी यासंदर्भात औपचारिक घोषणा केली जाईल.
देशातील एका स्टार्टअप कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर तयार केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर मोबाईलपेक्षाही लवकर चार्ज करता येते.
२०१८ हे वर्ष जवळजवळ संपल्यात जमा आहे. तेव्हा, भारताला आर्थिकदृष्ट्या हे वर्ष नेमके कसे गेले, भारतात काय महत्त्वाच्या आर्थिक घटना, घडामोडी घडल्या, याचा परामर्श घेणारा हा लेख...