लोहम कंपनीने ४५० कोटींची गुंतवणूक मिळवली

कॅक्टस वेंचर पार्टनर, सिंगुलारीटी वेंचर, बेअरिंग प्रायव्हेट इक्विटी, वेंचर ईस्ट व अजून काही संस्थांकडून हा निधी उभारला

    13-Mar-2024
Total Views |

Lohum
 
मुंबई: लिथीयम आयन बॅटरी बनवणारे व पुनर्वापर (रिसायकलिंग) करणारी कंपनी लोहम (Lohum) कंपनीने आपल्या विस्तारीकरणासाठी ४५० कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून उभे केले आहेत.सिरिज बी फंडिगअंतर्गत हा निधी बुधवारी कंपनीने मिळवलेला आहे.
 
भांडवल एकत्रितपणे उभारुन (Capital Infusion) हे कॅक्टस वेंचर पार्टनर, सिंगुलारीटी वेंचर,बेअरिंग प्रायव्हेट इक्विटी, वेंचर ईस्ट व अजून काही संस्थांकडून हा निधी उभारण्यात आला आहे ‌असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
 
कंपनीकडून या निधीचा विनिमय हा दैनंदिन कामकाजासाठी, पुनर्वापर प्रक्रियेसाठी व कंपनी विस्तारीकरणासाठी वापरला जाणार आहे. विशेषतः मध्यपूर्व, आफ्रिका, इयु, उत्तर अमेरिका या प्रदेशात कंपनीच्या उलाढालीत वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
बॅटरी रिसायकलिंग, बॅटरी रीपरपोजिंग, ट्रान्झिशन मटेरियल रिफाइनिंग आणि कॅथोड ऍक्टिव्ह मटेरियलच्या एंड-टू-एंड इन-हाउस इकोसिस्टमसह एकात्मिक बॅटरी लाइफसायकल मॅनेजमेंट सिस्टम असल्याचा दावा लोहमने केला आहे.
 
या विषयावर बोलताना, 'हा निधी आमच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराला गती देईल, आम्हाला भारतातील टॅलेंट पूलमधून उच्च व्यावसायिकांना नियुक्त करण्यास सक्षम करेल तसेच आमची ताकद वाढवेल आणि आमच्या उद्योग-अग्रणी R&D इनोव्हेशन सेंटरला नवीन उर्जा प्रदान करेल," लोहमचे संस्थापक आणि सीईओ रजत वर्मा म्हणाले.