
या कंपनीकडून आथर S340 आणि S450 या दोन स्कूटर्स लाँच करण्यात आली आहेत. या दोन्ही स्कूटर्स मोबाईल चार्जिंगपेक्षाही लवकर चार्ज होतात. असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या दोन्ही स्कूटर्सची बॅटरी चार्ज होण्यासाठी ५० मिनिटे लागतात. या ५० मिनिटांत स्कूटरचे ८० टक्के चार्जिंग होते. असे कंपनीचे म्हणणे आहे. या स्कूटरमध्ये २.४ किलो वजन असेलेली आवर्सची लिथियम ऑयनची बॅटरी बसविण्यात आली आहे. ही ५० हजार किलोमीटरपर्यंत चालू शकते. या बॅटरीला आयपी ६७ कडून स्वीकृती देण्यात आली आहे. त्यामुळे या स्कूटरवर पाणी आणि धुळीचा कोणताही परिणाम होत नाही. अशी माहिती कंपनीने दिली.
या स्कूटरची बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर ७५ किलोमीटरचा मायलेज देते. तसेच ३.९ सेकंदामध्ये ही स्कूटर ४० किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडू शकते. असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. स्कूटरमध्ये बॅलेंस ठेवण्यासाठी स्कूटरच्या मध्यभागी लॅग स्पेस बॅटरी बसविण्यात आली आहे. तसेच स्कूटरच्या पुढच्या आणि मागच्या चाकाला डिस्क ब्रेकचे फिचर देण्यात आले आहे. या स्कूटरला रिक्षाप्रमाणे रिव्हर्स गिअर देण्यात आला आहे. आथर S450 या स्कूटरची किंमत १ लाख २४ हजार ७५० रुपये आहे. तर आथर S340 या स्कूटरची किंमत १ लाख ९ हजार ७५० रुपये आहे.