(EAM S. Jaishankar's Big warning to Pakistan) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताने पाकपुरस्कृत दहशतवादाविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर सध्या पाकिस्तान-भारत सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. पाकिस्तानने पुन्हा अशा प्रकारच्या कुरापती केल्या तर भारत थेट पाकिस्तानात घुसून हल्ला करेल असा थेट इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. 'दहशतवादी पाकिस्तानात कुठेही असले तरी भारत सडेतोड प्रत्युत्तर देईल', असे एस जयशंकर यांनी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये एका मुलाखतीत बोलताना म्हटले आहे.
Read More
तालिबानशासित अफगाणिस्तानशी भारतासह पाकिस्तान आणि चीननेही आपले द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने अलीकडे पद्धतशीर पाऊले उचललेली दिसतात. त्याचे एकमेव कारण म्हणजे, अफगाणिस्तानचे भारतीय उपखंडातील भूराजकीय स्थान. याअनुषंगाने भारत-अफगाणिस्तान संबंधांचे आकलन करणारा हा लेख...
(Germany backs India in war against terrorism) भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Dr. S. Jaishankar) हे सध्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकाच व्यासपीठावरून संयुक्त पत्रकार परिषदेतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाकपुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला जर्मनीने पाठिंबा दर्शवला आहे.
भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील मुस्लीम मतपेढीचा दबाव होता, हे आज स्पष्ट झाले, अन्यथा मोदी सरकारने तीन-तीनदा पाकिस्तानवर लष्करी कारवाई करूनही कोणत्याच देशाने किंवा अमेरिकेनेही भारतावर दबावापोटी निर्बंध कसे लादले नाहीत?
Waves conference will shape the future of the entertainment world s jaishankar “जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद’ ही माध्यम आणि मनोरंजनविश्वाच्या भविष्याची रुपरेषा ठरवणार आहे. सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी परस्परांच्या सांस्कृतिक संवेदनशीलता जाणून जागतिक सहकार्य हाच प्रगतीचा मार्ग आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवार, दि. 2 मे रोजी केले.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा केली.
( India positive about bilateral trade deal with USA S. Jaishankar ) “भारत अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी केले आहे.
जागतिक सत्ता समतोल झपाट्याने बदलत असला, तरी त्याची दखल न घेतल्याने संयुक्त राष्ट्र ही संघटना आता कालबाह्य ठरत आहे. ही संघटना केवळ अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांच्या हातचे बाहुले बनल्यामुळे, जागतिक समस्यांच्या सोडवणुकीत ही संघटना अर्थहीन, निष्क्रिय आणि दुर्बळ ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या पुनर्रचनेची पुनश्च अधोरेखित केलेली मागणी म्हणूनच रास्त ठरावी.
S. Jaishankar भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशातील अंतरिम सरकारला कडक शब्दात सुनावले आहे. बांगलादेशला भारतासोबत असलेल्या संबंधांचा निर्णय घ्यावाच लागेल. रविवारी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी संबोधित केले. बांगलादेश सतत भारतविरोधी विधान करत आहे. तसेच अल्पसंख्यांकांवरही अन्याय अत्याचार सुरू आहेत. त्यावर एस. जयशंकर यांनी निषेध व्यक्त केला.
“लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) राजकारणासाठी परराष्ट्र धोरणसंदर्भात खोटे दावे करतात. मात्र, त्यांच्या या दाव्यांमुळे परदेशात भारताची प्रतिमा मलीन होते”; असे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर (Dr. S. Jaishankar) यांनी सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सुनावले आहे.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांविरोधात ( Editorial on Illegal Immigrants In America ) कठोर कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्याच भूमीवरून त्याचे स्वागत केले आहे. त्याचवेळी अशा भारतीयांना देशाची दारे उघडी असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कारण, भारताची घुसखोरीविरोधातील उक्ती आणि कृती सारखीच आहे...
नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांच्या शपथविधीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सोमवार, दि. २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या दौर्यावर जाणार आहेत. शपथविधी आयोजन समितीने यासाठी भारताला निमंत्रण पाठवले आहे.
(Dr. S. Jaishankar) परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर दि. २४ ते २९ डिसेंबर दरम्यान द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार बांगलादेशातील नागरिकांसह अल्पसंख्याकांचे संरक्षण ( Protect Hindus ) करण्यासाठी जबाबदार आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शुक्रवारी संसदेत केले आहे.
१९९० साली काँग्रेसने देशातील उद्योगांना कोणतेही संरक्षण न देता, आंधळेपणाने देशाच्या सीमा आंतरराष्ट्रीय उद्योगांसाठी खुल्या केल्या. जागतिकीकरणाने उद्योगाला चालना मिळून त्यातूनच अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, अशी अपेक्षा असताना भारतात त्यासाठी कोणतेही ठोस धोरण नसल्याने केवळ आयात वाढलेली दिसून आली.
( Dr. S. Jaishankar ) कॅनडामध्ये जस्टीन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखालील सरकार दहशतवाद्यांना ‘राजकीय आश्रय’ उपलब्ध करून देत आहे, अशी टिका परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी1 केली आहे.
( Dr. S. Jaishankar ) यशस्वी संस्थेतर्फे आयोजित "जागतिक स्तरावरील सध्याच्या उदयोन्मुख संधी" या विषयावर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, यांचा पुण्यातील प्रमुख नागरिकांशी वार्तालाप कार्यक्रम पार पडला.
S. Jaishankar परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) हे रविवारी २७ ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी मुंबईतील २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. मात्र आता पुन्हा एकदा जर अशी घटना घडल्यास प्रत्युत्तर दिले जाईल, असे जयशंकर यांनी रविवारी सांगितले. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मुंबई जे घडले त्याची पुनरावृत्ती होऊ नये. जिथे दहशतवादी हल्ला झाला आणि कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संयुक्त राष्ट्रसंघाची गरज यापूर्वीच वेळोवेळी अधोरेखित केली आहे. एकविसाव्या शतकातील आव्हानांना समर्थपणे तोंड देणारी नवी जागतिक व्यवस्था उभारणे ही आज काळाची गरज आहे. ज्या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली, ते हेतूच आज साध्य करण्यात संयुक्त राष्ट्रसंघ अपयशी ठरला आहे. धगधगता मध्य-पूर्व हा त्याचेच प्रतीक...
बांग्लादेशमध्ये अराजक माजल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. त्यानंतर आता परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आसियान बैठकीसाठी गुरुवार, दि. २५ जुलै २०२४ लाओसची राजधानी वियनतियाने येथे पोहोचले आहेत. यादरम्यान, ते म्हणाले की दक्षिण पूर्व राष्ट्रांच्या संघटनेशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी ते उत्सुक आहेत. जयशंकर म्हणाले की, भारत आपल्या 'ॲक्ट ईस्ट पॉलिसी'ला १० वर्षे पूर्ण करत आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेत जम्मू – काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने पुन्हा एकदा चांगलेच सुनावले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.
कुवैतमधील मंगफ येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भारतीय लोकांचा समावेश असून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दक्षिण मंगफमधील आग दुर्घटनेत मृत पावलेले भारतीय केरळचे असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
डॉ. एस. जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून मंगळवार, दि. ११ जून २०२४ पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताना एस. जयशंकर म्हणाले की, "आम्हा सर्वांना पूर्ण विश्वास आहे की हे आम्हाला 'विश्व बंधू' म्हणून स्थापित करेल, एक देश जो अतिशय अशांत जगात आहे, एक अतिशय विभाजित जग आहे, संघर्ष आणि तणावाच्या जगात आहे."
पाकव्याप्त काश्मिर भारताचे अंग आहे. मागच्या सरकारमधील लोकांच्या चुकीमुळे ते आपल्यातून काही काळासाठी गेले आहे. पण संसदेच्या सर्वसंमतीने ते निश्चित परत मिळवले जाईल, यात काही शंका घेण्याची गरज नाही, असा विश्वास केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी गुरूवार, दि. 16 मे रोजी व्यक्त केला. नाशिकच्या कॉलेज रोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉल येथे श्वास फाऊंडेशनतर्फे विश्वबंधू भारत हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. जयशंकर यांची ज्येष्ठ विचारवंत व लेखक विजय चौथाईवाले आ
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुर्णपणे दहशतमुक्त आहे. एक दिवस पाकव्याप्त काश्मीरही आम्ही भारताला जोडू, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज व्यक्त केला.
स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक कशी घ्यावी, हे संयुक्त राष्ट्रसंघाने भारतास सांगू नये; अशा शब्दात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सुनावले आहे.संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अधिकाऱ्याने गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना भारतीय निवडणुकांवर भाष्य केले होते. ज्यामध्ये प्रवक्त्याने म्हटले होते की भारतातील लोकांच्या राजकीय आणि नागरी हक्कांचे संरक्षण केले जाईल आणि प्रत्येकजण मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात मतदान करू शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.
चीन-पाकिस्तानने बळकावलेले प्रदेश परत घेण्याबाबत भारताने विचार करावा की सद्दस्थिती स्वीकारावी या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भाष्य केले आहे. तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी चीनच्या धोक्याला कमी लेखण्याची चूक ही सद्दस्थितीस कारणीभूत आहे, असा आरोप अहमदाबाद येथे गुजरात चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे आयोजित एका कार्यक्रमात केला आहे.
जयशंकर यांनी त्यांच्या फिलिपाईन्स दौर्यात केलेल्या वक्तव्यामुळे चीनला चांगल्याच मिरच्या झोंबल्या. जयशंकर यांनी आपल्या दौर्यात चीनच्या विस्तारवादी नीतीला लगाम लावण्यासाठी, फिलिपाईन्ससोबत मिळून काम करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे जयशंकर यांच्या या दौर्याने दक्षिण चीन समुद्रात ड्रॅगनच्या विस्तारवादी नीतीला आव्हान दिले आहे.
पाच दिवसांचा रशिया दौरा आटपून, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर दि. ४ ते ५ जानेवारीदरम्यान दोन दिवसांच्या नेपाळ दौर्यावर गेले. या दौर्यात त्यांनी नेपाळसोबतचे द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच परराष्ट्र मंत्री नेपाळमधील चीनच्या प्रभावाला रोखण्यातसुद्धा यशस्वी झाले. नेपाळसोबत भारताचे ’रोटी-बेटी’चे नातं आहे. पण, डाव्यांची सत्ता आल्यापासून, नेपाळमध्ये चीनचा प्रभाव वाढलेला आहे. त्यामुळे सामारिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या, नेपाळमधील चिनी कुरापती बंद करणे, भारतासाठी क्रमप्राप्
लहान तोंडी मोठा घास घेतला की, तो घशात अडकणारच! मालदीवनेही आपल्या लहान तोंडात भारताला दुखावण्याचा असाच मोठा घास घेतला असून, त्यामुळे त्याच्या श्वासाला घरघर लागली आहे. केवळ पर्यटकांवर अवलंबून असलेल्या, या बेटसमूहाची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीनंतर डबघाईला येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शत्रूला केवळ लष्करी हल्ल्यांनीच नामोहरम केले जाते असे नव्हे; कारण मोदी हे तर राजनैतिक डावपेचांनीही एखाद्या देशाला गुडघ्यावर आणू शकतात.
कोणत्याही परिस्थितीत अतिरेकी विचारसरणी व कृत्यांना थारा मिळू नये, असे मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेतील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याविषयी व्यक्त केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाने संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण खनिजे आणि व्यापार आणि गुंतवणूक यासारख्या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी टू प्लस टू मंत्रीस्तरीय चर्चा केली.दुसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया टू प्लस टू मंत्रिस्तरीय चर्चेअंतर्गत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स आणि परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्याशी चर्चा केली.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच ’जी २०’ परिषदेदरम्यान एक विधान केले होते की, “जग आता पुनःवैश्विकीकरणाकडे तसेच नवीन संरचनेकडे सरकत आहे. पण, ते जग आता ’बहुध्रुवीय’ झालेले आहे आणि अजून ही प्रक्रिया चालूच आहे.” येणार्या काळात जग पूर्वीप्रमाणे अमेरिका आणि त्यांच्या दोस्त राष्ट्रांच्या प्रभावाखालील असणार नाही. जग आता बहुध्रुवीय होत असताना, विविध देशांच्या चलनांमधून व्यवहार वाढीला लागणार आहेत. थोडक्यात, अमेरिकन डॉलर आणि युरोपियन चलनांचा जगात पसरलेला दबदबा यापुढील काळात कमी होत जाणार आहे. ही एक न थ
कतारमध्ये अटकेत असलेल्या भारतीय नौदलातील माजी अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असा दिलासा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्या कुटुंबियांना सोमवारी दिला आहे.
दळणवळणाशी संबंधित प्रकल्पांनी सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे दळणवळणाचा विकास म्हणजे कर्जाचे जाळे नव्हे, असा टोला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी किर्गिस्तान येथे शांघाय सहकार्य परिषदेत चीनचे नाव न घेता लगावला आहे.
इस्रायल-‘हमास’च्या संघर्षानंतर भारतविरोधी शक्तींनीही बेटकुळ्या फुगवण्यास सुरुवात केल्याचे दिसते. मग पाकिस्तानी असो वा खलिस्तानी, त्यांनी भारतालाही ‘हमास’सारखा खुनी हल्ला सहन करावा लागेल, अशी फुटकळ धमकी देण्याचे उद्योग केले. म्हणा, अशा धमक्यांना मोदी सरकारने यापूर्वीही कधी भीक घातली नव्हती आणि भविष्यातही हे धमकी देणारे ‘अज्ञातां’च्या हस्ते कधी यमसदनी धाडले जातील, हेही सांगणे अवघडच. पण, म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तशीच खलिस्तानींची सध्याची गत!
इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १२०० इस्रायली नागरिकांचा बळी गेला आहे. इस्रायलने पण हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत, हमासच्या १५०० दहशतवाद्यांना मारले आहे. दोन्ही बाजूने युद्धविरामाची कोणतीच चिन्ह दिसत नसल्यामुळे हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’च्या तयारीचा आढावा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी उच्चस्तरीय बैठक झाली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भारताला इतर कोणाकडून शिकण्याची गरज नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यास हिंसाचार भडकविण्यासाठी वापर केला जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे कॅनडात होणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांविरोधात भारताने व्हिसा सेवा निलंबित केली आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी वॉशिंग्टन डिसी येथे पत्रकारपरिषदेत शुक्रवारी केले आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकी परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्यामधील द्विपक्षीय चर्चेत कॅनडाविषयी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
‘भारत’ या शब्दास विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी भारताची राज्यघटना वाचून बोलावे, अशा सल्ला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले आहे.
रशियासह चीनचे राष्ट्राध्यक्ष ‘जी २०’ परिषदेला उपस्थित राहणार नसल्याने फारसा फरक पडत नसल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ठामपणे सांगतात. ही परिषद म्हणजे राजकीय आखाडा नाही, असेही ते ठळकपणे नमूद करतात. असे परखडपणे सांगणारा हा नवा भारत आहे. विकसित राष्ट्रांची मनधरणी आपण करणार नसल्याचे, तो कृतीतून दाखवून देतो. संपूर्ण जगाला भारतात होणार्या या परिषदेतून काही साध्य करून घ्यायचे आहे. जगभरातील नेत्यांचा भारताबद्दलचा हा बदललेला दृष्टिकोन अभिमानास्पद असाच!
चीनने भारताचे अविभाज्य अंग असलेल्या अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा भाग आपल्या नकाशात दाखवला आहे. चीनच्या या कृत्याची भारताने तीव्र शब्दात निंदा केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, "चीनला असे नकाशे जारी करण्याची सवय आहे. असे दावे करून इतरांचा प्रदेश आपला होत नाही. भारताच्या काही भागांसह नकाशा जारी केल्याने काहीही बदलणार नाही."
खलिस्तान समर्थक कट्टरवाद्यांशी सामना करण्यासाठी युकेने नवा फंड जाहीर केला आहे. भारत आणि युके कट्टरतावादाशी लढण्यासाठी संयुक्त कार्य दलाच्या स्थापनेसाठीदेखील काम करत आहेत.
भारतातून थेट पाकिस्तानात आपल्या प्रियकराच्या शोधात गेलेल्या अंजूने अखेर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, अंजूने आजतक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, आपण भारतातून पाकिस्तानात इस्लाम धर्म स्वीकारल्याचे तिने जाहीर केले आहे. तसेच, आपण भारतात येण्याच्या लायकीचे राहिले नसल्याचे देखील तिने सांगितले. दरम्यान, अंजूने फेसबुक फ्रेंड नसरुल्लाला भेटण्यासाठी ती पाकिस्तान गाठून त्याच्याशी विवाह केला. या लग्नानंतर अंजूच्या व्यथा समोर येऊ लागल्या आहेत.
राज्यसभेच्या ११ जागांसाठी २४ जुलै रोजी मतदान होणार होते. पण ७ दिवस आधीच सर्व जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून येतील, हे निश्चित झाले आहे. या ११ जागांपैकी पश्चिम बंगालमधून ७ , गुजरातमधून ३ आणि १ जागा गोवा राज्यातील आहे. पराराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे गुजरातमधून तर डेरेक ओब्रायन यांच्यासह तृणमूलचे ६ आणि भाजपचे ५ उमेदवार निवडून आले आहेत. बंगालमधून पहिल्यांदाच राज्यसभेवर भाजप उमेदवार निवडून गेला आहे. आता वरिष्ठ सभागृहात भाजप आणि मित्रपक्षांच्या एकूण जागा १०५ झाल्या आहेत.तर काँग्रेसच्या एका जागेत घट झाली आहे.
२०२५ पर्यंत भारताचे पाच अब्ज डॉलर्स किमतीच्या संरक्षण निर्यातीला स्पर्श करण्याचे उद्दिष्ट आहे. हा सौदा फक्त शस्त्रास्त्रांच्या व्यापाराचा नाही आहे, तर चीनविरुद्ध उभे ठाकण्यासाठी संरक्षण उपकरणाची विक्री करण्याची भारताची भूमिका आहे. भारतीय क्षेपणास्त्रांमुळे फिलिपाईन्सला दक्षिण चीन समुद्रात त्यांचा हक्क मिळू शकेल. भारताने फिलिपाईन्सला सैन्याला सायबर सुरक्षा प्रशिक्षण देऊ केले आहे.
भारतीयांना आता लवकरच ई-पासपोर्ट मिळणार आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त लवकरच पासपोर्ट सेवा कार्यक्रम २.० सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर लोकांना एक चिप असलेला ई-पासपोर्ट मिळेल.
आधुनिक काळातील जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणजे भारत आणि जगातील सर्वात जुनी लोकशाही म्हणजे अमेरिका. या दोन्ही लोकशाहीचे स्तंभ मानल्या जाणार्या देशांचे मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत होण्याच्या मार्गावर आहेत. खरं तर पाश्चात्यांशी जवळीक साधण्याचे वाईट परिणामच आजवर आपण अनुभवलेले. त्यामुळे या मैत्रीत जपून पावलं टाकण्याची भारताला गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी अमेरिका दौर्यानिमित्ताने या दोन्ही देशांच्या ऐतिहासिक संबंधांचा घेतलेला हा धावता आढावा...