नवी दिल्ली : राज्यसभेच्या ११ जागांसाठी २४ जुलै रोजी मतदान होणार होते. पण ७ दिवस आधीच सर्व जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून येतील, हे निश्चित झाले आहे. या ११ जागांपैकी पश्चिम बंगालमधून ७ , गुजरातमधून ३ आणि १ जागा गोवा राज्यातील आहे. पराराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे गुजरातमधून तर डेरेक ओब्रायन यांच्यासह तृणमूलचे ६ आणि भाजपचे ५ उमेदवार निवडून आले आहेत. बंगालमधून पहिल्यांदाच राज्यसभेवर भाजप उमेदवार निवडून गेला आहे. आता वरिष्ठ सभागृहात भाजप आणि मित्रपक्षांच्या एकूण जागा १०५ झाल्या आहेत.तर काँग्रेसच्या एका जागेत घट झाली आहे.
जयशंकर दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आले
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांपैकी ज्यांची मुदत पुढील महिन्यात संपत आहे, भाजपने माजी आमदार बाबूभाई देसाई आणि केसरीदेव सिंग झाला यांना दोन आणि एस जयशंकर एका जागेवर उमेदवार दिले होते. विरोधी पक्षाकडून उमेदवार नसल्याने तिन्ही उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
गुजरात विधानसभेत भाजपची ताकद पाहता विजय निश्चित होता.
जयशंकर गुजरातमधून दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आले आहेत. त्यांच्याशिवाय बाबूभाई देसाई आणि केसरीदेव सिंह झाला यांना पहिल्यांदाच राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. त्याचवेळी काँग्रेसने अर्ज न भरण्याची घोषणा केली होती. गुजरात विधानसभेत भाजपचे १५६ आमदार असून एकूण जागा १८२ आहेत. त्याचवेळी भाजपला तीन अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. अशा स्थितीत भाजप उमेदवारांचा विजय निश्चित होता.