नवी दिल्ली : (Dr. S. Jaishankar) परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर दि. २४ ते २९ डिसेंबर दरम्यान द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्री जयशंकर प्रमुख द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्या समकक्षांना भेटतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे. या चर्चेत भारत-अमेरिका संबंध मजबूत करणे, जागतिक आव्हानांना सामोरे जाणे आणि अनेक क्षेत्रात सहकार्याचे मार्ग शोधणे यावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे.
यापूर्वी १९ डिसेंबर रोजी अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी अमेरिका – भारत भागीदारीच्या यशावर टिप्पणी केली. युएस-इंडिया बिझनेस कौन्सिलने (युएसआयबीसी) गुरुवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना गार्सेटी म्हणाले, दोन्ही देशांना एकत्रितपणे व्यापारातील कराचे दर कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
दरम्यान, अमेरिकेत आता ट्रम्प प्रशासन देशाची सूत्रे हाती घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या पुढील संबंधांसाठी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
शेख हसीना यांना परत पाठवा – बांगलादेशाची भारतास विनंती
बांगलादेशने भारताला अधिकृतपणे माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवण्याची विनंती केली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार, तौहीद हुसेन यांनी सांगितले की, भारत सरकारला “नोट”द्वारे ही विनंती करण्यात आली आहे.