उत्तराखंडला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून, ढगफुटी सदृश्यस्थिती झाली आहे. याचा फटका महाराष्ट्रातील दोनशे भाविकांना बसला आहे. यमुनोत्री धाम येथे दर्शनासाठी गेलेल्या ६०० भाविकांपैकी २०० जण हे महाराष्ट्रातील आहेत. सततच्या कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
Read More
महाकुंभ मेळ्यात सनातनी श्रद्धाळूंचा लोटलेला महापूर आणि त्यातून जगाला दिसलेली सनातन संस्कृतीची विलक्षण शक्ती ही जगाला आश्चर्याचा धक्का देणारीच होती. या कुंभमेळ्याचे केलेले आयोजन यामुळे अनेक देशविघातक वृत्तींनाही मोठाच धक्का बसला आहे. असे असले तरीही श्रद्धाळू भक्तांना निश्चितच अलौकिक सुखाचा अनुभव मिळाला यात शंका नाही.
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ ( Maha Kumbh Mela ) सुरु आहे. त्यासाठी लाखो भाविक येथे जात आहेत. त्यातच आता सरकारने आकडेवारी जारी केली आहे. २७ जानेवारी रोजी ४६.६४ लाखाहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले आहे. तर २६ जानेवारीपर्यंत १३.२१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र नद्यांच्या संगमामध्ये श्रद्धेची डुबकी घेतली. उत्तर प्रदेश सरकारने यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान अमित शाह महाकुंभमध्ये सहभागी होणार आहेत.
मुंबई : इंग्रजी नववर्षाचे स्वागत हे सर्व ठिकाणी जल्लोषात करण्यात आले. नववर्षाची चांगली सुरूवात करण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ( Siddhivinayak Temple ) सकाळी गणपती बाप्पाची आरती संपन्न झाली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. २०२५ हे इंग्रजी नववर्ष सुखाचे, समाधानाचे व समृध्दीचे जावो अशी प्रार्थना करत सर्व भाविकांनी आपल्या नववर्षाची सुरुवात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन केले.
Khalistani गटाने हिंदू गटाला लक्ष केले गेले असल्याची घटना कॅनडा येथे घडली आहे. मात्र या हल्ल्याला आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी ब्रॅम्प्टन येथील मंदिरात हिंदू भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. देशात हिंसाचाराची कृत्ये अस्वीकार्य आहेत. रविवारी हिंदू मंदिरात भाविकांच्या एका गटाला कथित खलिस्तानी समर्थकांनी लक्ष्य केले गेले. यामुळे आता याप्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे.
शिर्डीला जाणाऱ्या टिटवाळ्याच्या तिघा साईभक्तांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना पुन्हा एकदा ठामपणे उभी राहिली आहे. या साईभक्तांच्या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून प्रत्येकी २ लाखांची आर्थिक मदत करण्यासह शिवसेना शहर शाखेकडून त्यांच्या दोघा लहान मुलींच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे. टिटवाळ्यातील या कुटुंबियांना आमदार भोईर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आर्थिक मदत देण्यात आली.
कल्याण लोकसभा मतदार संघातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 1350 हून अधिक रामभक्त रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येत गेले आहेत.
उत्तर प्रदेशच्या बरेलीतून एक धक्कादायक घटना घडली आहे. कट्टरपंथी जमावाने प्रभू श्रीरामाची पूजा करणाऱ्या रामभक्तांवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. भोजीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीयापूर हरवंशपूर गावात कट्टरपंथीयांनी अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या प्रसंगी प्रभू श्रीरामाच्या पूजेचे आयोजन केले होते. या पूजेदरम्यान कट्टरपंथी जमावाने रामभक्तांवर दगडफेक केली.
अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्या समर्थकांमध्ये आणि भाविकांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. अजय राय यांच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात दर्शनाला जाताना काँग्रेस पक्षाचा झेंडा घेवून गेले होते. त्यावरुन दोन्ही गटात शाब्दीक बाचाबाची झाली, याचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले.
दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने आपण प्रभू श्रीरामाचा आणि हनुमानाचा भक्त असल्याचा खुलासा केला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, केशव महाराज हा दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेत राहून सुद्धा केशव महाराज आपल्या हिंदू धर्माचे काटेकोरपणे पालन करतो.
आपले आराध्य दैवत प्रभू रामचंद्र महापराक्रमी तर आहेतच. त्यांच्या पुढे उभे राहायला काळालाही भीती वाटते. पण, एवढ्याने त्याचे वर्णन होत नाही. विश्वातील जे जे काही उत्तम गुण आहेत, ते सारे रामाच्या ठिकाणी एकवटले आहेत. पराक्रम, चारित्र्यसंपन्नता, न्यायप्रियता, भक्तांचे रक्षण, दुष्टदुर्जनांचा संहार हे गुण रामाला पाहता क्षणीच जाणवतात. समर्थांच्या काळी म्लेंच्छांच्या विध्वंसक कारवायांमुळे सर्वत्र हिंदू समाजाची वाताहत झालेली होती.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्णय; भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी
महात्मा गांधी हे स्वतःला ‘सनातनी हिंदू’ म्हणवून घेत असत. भगवान श्रीकृष्णाने अजुर्र्नाला कुरुक्षेत्रावर सांगितलेल्या श्रीमद्भगवद्गीतेचे महात्मा गांधींच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान होते. सोबतच वेद, उपनिषदे आदींवरही त्यांची आस्था होती. महात्मा गांधींचे हिंदू जीवन दर्शन आध्यात्मिक अंगाने जाणारे होते. सदर लेखात गांधीजींच्या याच पैलूचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे.
पौष महिन्यातील शुद्ध अष्टमीला ‘शाकंभरी’ देवीचं नवरात्र प्रारंभ होतं. पौषातली शुद्ध अष्टमी पूर्णपणाने शुद्ध असणारी श्रीशाकंभरी देवीची स्थापना केली जाते.
सिन्नर तालुक्यात देवपूर फाट्याजवळ भरधाव येणारी चारचाकी साईबाबांच्या पालखीला थडकली. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले.
मूठभर प्रसिद्धीपिपासू, अराजकवादी आणि काही काही तर अहिंदू असलेल्या महिलांच्या कथित भाविकगिरीच्या रक्षणापायी अय्यप्पाच्या खऱ्याखुऱ्या महिला भक्तांशी घृणास्पद व्यवहार केला गेला. ज्याची तुलना केवळ क्रूरकर्मा औरंगजेब वा टिपू सुलतानशीच होऊ शकते.