शांघाय २०२६ जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड स्पर्धांना पालघर जिल्ह्यात प्रारंभ

    14-Sep-2025

पालघर : जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा (WorldSkills Competition) दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. यंदाची स्पर्धा सन २०२६ मध्ये चीनमधील शांघाय येथे होणार असून, त्यासाठी भारतात विविध स्तरांवर निवड स्पर्धांची सुरुवात झाली आहे.

या स्पर्धा ऑलिम्पिकप्रमाणेच २३ वर्षांखालील तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात. मागील ४७व्या आवृत्तीत ६३ क्षेत्रांमधून ५० देशांतील १०,००० हून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला होता.

राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतात जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यातून निवड झालेल्या उमेदवारांना शांघाय २०२६ साठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

पात्रता निकषांनुसार, सर्वसाधारण ५० कौशल्य क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००४ किंवा नंतरचा असावा. तर डिजिटल कन्स्ट्रक्शन, क्लाऊड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, मेकॅट्रॉनिक्स, एअरक्राफ्ट मेंटेनन्स यांसारख्या तांत्रिक क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००१ किंवा नंतरचा असणे आवश्यक आहे.

या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी पालघर जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील ITI, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालये, हॉस्पिटॅलिटी व फाइन आर्ट्स संस्था, ज्वेलरी मेकिंग इन्स्टिट्यूट, Maharashtra State Skill University, MSBVET, MSME Tool Rooms, IIT, CIPET, Skill Training Institutes यांना आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सादर करण्याची आणि आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे.






संबंधित मजकूर