मुंबई : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात मतदारसंख्येत ८ टक्क्यांची वाढ झाली, हे संशयास्पद आहे,” असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. मात्र, त्यांच्या स्वतःच्या वायनाड मतदारसंघात याच काळात ७.७ टक्क्यांनी मतदार वाढले होते. मग वायनाडला लोकशाही आणि नागपुरात चोरी कशी?, असा सवाल उपस्थित करीत भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी जोरदार हल्लाबोल केला.
नवनाथ बन यांनी आकडेवारी सादर करीत राहुल गांधींच्या आरोपांची चिरफाड केली. ते म्हणाले, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात २०१९ मध्ये ३ लाख ८४ हजार ३५५ मतदार होते, तर २०२४ मध्ये हेच प्रमाण ४ लाख ११ हजार २४१ वर गेले, म्हणजेच सुमारे ७ टक्के वाढ झाली. याउलट, वायनाडमध्ये १ लाखांहून अधिक मतदारांची वाढ होऊन १३.५७ लाखांवरून १४.६२ लाखांपर्यंत संख्या गेली, म्हणजे ७.७ टक्के वाढ झाली. तरी वायनाडमध्ये ही वाढ लोकशाही, तर नागपूरमध्ये घोटाळा, हे तर्काला धरून नाही, असे बन यांनी नमूद केले.
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारख्या शहरी भागांत स्थलांतर, नवमतदारांची नोंदणी आणि घरांतून घरांत बदल यामुळे मतदारसंख्या ५ ते ८ टक्क्यांनी वाढत असते, याकडेही नवनाथ बन यांनी लक्ष वेधले. “आपल्या मतदारसंघात मतदार वाढले तर जागरूक जनता… आणि महाराष्ट्रात वाढले तर बनावट मतदार? Vote Theft नव्हे, Truth Theft सुरु आहे, आणि राहुल गांधी त्याचे शिल्पकार आहेत,” असा घणाघात नवनाथ बन यांनी केला. तसेच “तुमच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महाराष्ट्रात किती जागांवर पराभूत झाली, याची संपूर्ण आकडेवारी जाहीर करून दाखवा”, असे आव्हानही त्यांनी दिले.
वायनाड (राहुल गांधी यांचा मतदारसंघ)
➡️ 2019 मध्ये मतदार – 13,57,819
➡️ 2024 मध्ये मतदार – 14,62,423
➡️ वाढ –1,04,604 (7.7%)
नागपूर दक्षिण पश्चिम (देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ)