अल जझीराच्या खोट्या बातम्यांची पोलखोल; IAF पायलट बाबत केलेला दावा खोटा! अखेर पाक सैन्याची कबुली

    12-May-2025
Total Views | 54

Al Jazeera
 
नवी दिल्ली : (Al Jazeera's fake news exposed) भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून सोशल मीडियावर सातत्याने खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. यात भारतीय हवाई दलाच्या महिला पायलट स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून ही खोटी बातमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
दरम्यान पायलट शिवांगी सिंग सुरक्षित असल्याची माहिती भारतीय पत्रकार शिव अरूर यांनी दिली आहे. काही काळापूर्वी त्यांनी शिवांगी सिंग यांच्याशी संवाद साधला असल्याचेही त्यांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे, या खोट्या बातम्यांची सुरुवात जिहादी प्रचारासाठी ओळखली जाणारी कतारस्थित वृत्तसंस्था ‘अल जझीरा’ने केल्याचे उघड झाले आहे. अल जझीराचे पत्रकार कमाल हैदर यांनी इस्लामाबादहून लाईव्ह रिपोर्टिंग करताना दावा केला होता की, पाकिस्तानने दोन भारतीय लढाऊ विमाने पाडली असून, एक महिला पायलट त्यांच्या ताब्यात आहे. पाकिस्तानच्या हँडल्सवरून या खोट्या दाव्यांचा व्हिडीओही शेअर करण्यात आला. शिवाय, “चाय पीनी है, अभिनंदन के बाद एक और मिली” अशा प्रकारचा खोटा मजकूरसुद्धा पसरवण्यात आला.
 
 
 
तथापि, पाकिस्तानी लष्करानेच नंतर स्पष्ट केले की, त्यांच्या ताब्यात कोणताही भारतीय अधिकारी नाही.  पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक अहमद शरीफ चौधरी यांनी ११ मे रोजी एका पत्रकार परिषदेत पुष्टी केली की, पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही भारतीय वैमानिकाला ताब्यात घेतलेले नाही. पाकिस्तानी डीजी आयएसपीआर म्हणाले की, भारतीय महिला वैमानिकाला पकडल्याचे दावे केवळ सोशल मीडियावरील चर्चांचा भाग आहेत. खरंतर यापूर्वीचभारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने याबाबत फॅक्ट चेक करून या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पीआयबीने केले आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121