मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Hanuman Statue in US) अमेरिकेतील टेक्सासमध्ये हनुमंताची ९० फूट उंचीची कांस्य प्रतिमा बसवण्यात आली आहे. शुगर लॅण्ड येथील श्री अष्टलक्ष्मी मंदिरात या भव्य प्रतिमेची स्थापना करण्यात आली आहे. दि. १५ ते १८ ऑगस्ट या तीन दिवसीय झालेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर प्रतिमेचे नुकतेच अनावरण करण्यात आले. युनायटेड स्टेट्समधील हा तिसरा सर्वात उंच पुतळा असून या प्रतिमेला 'स्टॅच्यू ऑफ युनियन' असे नाव देण्यात आले आहे. कारण जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला लंकेत नेले होते, तेव्हा हनुमंतानेच सातासमुद्रापार जाऊन करून माता सीतेला शोधले होते. त्यांनीच श्रीराम आणि माता सीता यांचे पुनर्मिलन घडवून आणले होते, म्हणून या पुतळ्याला 'स्टॅच्यू ऑफ युनियन' असे नाव देण्यात आले आहे