राहुल गांधी-लोको पायलट यांच्यातील संवादाचे वास्तव समोर; उत्तर रेल्वेकडून मोठा खुलासा!

    06-Jul-2024
Total Views |
rahul gandhi loco pilot conversation


नवी दिल्ली :           काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच भारतीय रेल्वेच्या लोको-पायलटशी संवाद साधला होता. हा संवाद स्क्रिप्टेड ड्रामा असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक स्टंटबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. कधी ते मेकॅनिकच्या दुकानात गेले तर कधी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये गेल्याचे दिसून आले होते.

पण आता सरकारला कोंडीत पकडण्याचा राहुल गांधी यांच्या प्रयत्नातील स्क्रिप्टेड ड्रामा उघड झाला आहे. वास्तविक, दि. ०५ जुलै २०२४ रोजी राहुल यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचत तेथे त्यांनी लोको पायलटशी संवाद साधला होता. या संवादाचे वास्तव आता समोर येत आहे. आता ०८ कॅमेरामन आणि डायरेक्टर सह स्टेशनवर पोहोचले होते. राहुल गांधी यांनी लोको-पायलट व्हिडिओची स्क्रिप्ट आधीच निश्चित केल्याचे दिसून आले आहे.

राहुल गांधी आणि लोको-पायलट्स यांच्या संवादाची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता खुद्द उत्तर रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे. मुख्य पीआरओ दीपक कुमार यांनी सांगितले की, रेल्वेने एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी हे कॅमेरा घेऊन रील बनवताना दिसत आहे. तर राहुल गांधी हे एखाद्या चित्रपटाचे शूटिंग असल्याचे समजून शूटिंग पाहण्यासाठी तेथे उपस्थित राहिले. या संपूर्ण प्रकरणावर राहुल गांधींची खिल्ली उडवली जात आहे.