सागरी सुरक्षा हा महत्वाचा विषय गतीने भरती प्रक्रिया पूर्ण करावी

    04-Jul-2024
Total Views |

प्रवीण दरेकर
 
मुंबई: सागरी सुरक्षा हा महत्वाचा विषय असून गतीने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी. जरी ते चालक टेक्निकल असले तरी त्यांचे अधिकार असलेले प्रमुख हे सरकारी भाग असले तर सुरक्षेच्या दृष्टीने आणखी सोयीचे होईल, असे सांगत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सरकारचे लक्ष वेधले. आज सभागृहात आ. रमेश पाटील यांनी राज्य पोलीस दलात कंत्राटी कर्मचारी भरती रद्द करण्याचा निर्णय करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
 
या चर्चेत सहभागी होत आ. दरेकर म्हणाले की, एका वर्तमानपत्रात कंत्राटी भरती करून सागरी सुरक्षेशी खेळ आणि कंत्राटी ऐवजी पदोन्नतीने भरती करा अशा प्रकारची मागणी होती. आज जर हा प्रश्न आला नसता तर सागरी सुरक्षेची सरकारला काळजी नाही. पदोन्नती न करता असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होतोय, अशा प्रकारचे खोटे चित्र निश्चितपणे उभे राहिले असते. उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या उत्तरात कोणत्याही अंमलदारांच्या पदोन्नतीवर विपरीत परिणाम होणार नाही असे स्पष्टपणे आलेय.
 
जे पोलीस उपनिरीक्षक किंवा प्रथम श्रेणीचे इंजिन चालक आहेत त्यांना कायम स्वरूपी सरळ कोट्यातील १६५ रिक्त पदांपैकी साधारण ६१ पदे जी आहेत त्याला आपण मान्यता दिलीय, भरतीची प्रक्रिया सुरुही केली आहे. सागरी सुरक्षा हा महत्वाचा प्रश्न आहे. गतीने लवकरात लवकर ही भरती केली आणि जरी ते चालक टेक्निकल असले तरी त्यांचे अधिकार असलेले प्रमुख सरकारी भाग असले तर सुरक्षेच्या दृष्टीने आणखी सोयीचे होईल असे सांगत दरेकरांनी सरकारचे लक्ष वेधले.
 
यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर ही भरती झाली पाहिजे. तशा प्रकारे ते करण्यात येईल. कोणी जर पदोन्नतीला पात्र असेल त्यांना आपण पदोन्नती देतोच तीही देण्यात येईल. जर नसेल तर आपण आता भरती प्रक्रिया सूरु केली आहे. ती अधिक वेगाने कशी करता येईल हा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.