LokSabha Result 2024: मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर, तर उत्तरप्रदेशमध्ये रवी किशन यांनीही मारली बाजी

    04-Jun-2024
Total Views |
 
hema malini
 
 
मुंबई : देशाचं संपुर्ण लक्ष सध्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे लागले देशभरात सर्वच राजकीय पक्षांची एकमेकांसोबत मोठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, यंदा भाजपकडून हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांना तिकीट देण्यात आले होते. यात अभिनेत्री कंगना राणावत, हेमा मालिनी, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, रवी किशन यांची नावे आहेत. हेमा मालिनी या मथुरेतून निवडणूक लढत होत्या. सध्या त्या १ लाख मतांनी आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे मंडीतही कंगना राणावतने बाजी मारली आहे.
 
बॉलिवूड क्वीन कंगना राणावत पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढत असून हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून ती भाजपाच्या तिकीटावर उभी होती. ती जवळपास ३६ हजार मतांनी आघाडीवर आहे. तर दुसरीकडे मथुरेतून हेमा मालिनी यांनी यंदाही निवडणूक लढवली असून गेल्या दोन टर्मपासून त्या इथल्या भाजपच्या खासदार म्हणून कार्यरत आहेत. ही त्यांची तिसरी टर्म असून सध्या मतमोजणीत १ लाख ९४ हजार ३२६ मतांनी आघाडीवर आहेत. तर श्रीरामाच्या भूमिकेत दिसलेले अभिनेते अरुण गोविल यांनी भाजपच्या तिकिटावरुन मेरठ मधून निवडणूक लढवली असून ते सध्या पिछाडीवर आहेत.
 
तर, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून उभे होते. त्यांच्या विरोधात भाजपचे सुरिंदरसिंह आहलुवालिया असून शत्रुघ्न सिन्हा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथून भोजपुरी स्टार रवी किशन सध्या आघाडीवर आहेत.