डॉ. विक्रम संपत-विष्णू शंकर जैन : मुंबईकरांसाठी खास वैचारिक मेजवानी

    09-May-2024
Total Views |

Vikram Sampath - Vishnu Shankar Jain
(Vikram Sampath - Vishnu Shankar Jain)

मुंबई (प्रतिनिधी) :
लोढा फाऊंडेशन आणि भारत मंथन फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने लेखक आणि सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक डॉ. विक्रम संपत लिखीत 'प्रतीक्षा शिवाची : काशी-ज्ञानवापीच्या सत्याचा शोध' हे पुस्तक मुंबईत प्रकाशित होत आहे. शनिवार, दि.१८ मे रोजी सायंकाळी ६ वा. प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यासंकुल, सर भालचंद्र मार्ग, हिंदू कॉलनी, दादर (पू.) येथे सदर कार्यक्रम संपन्न होईल.

हे वाचलंत का? : झपाट्याने वाढणारी मुस्लीम लोकसंख्या देशासाठी विघातक!

डॉ. विक्रम संपत यांच्या 'वेटींग फॉर शिवा : अनर्थिंग ट्रुथ ऑफ काशीज् ज्ञावनापी' या इंग्रजी पुस्तकाचे ते मराठी भाषांतर आहे. कार्यक्रमाला स्वतः विक्रम संपत यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असेल. तर विशेष अतिथी हिंदू मंदिरासाठी कायदेशीर संघर्ष करणारे वरिष्ठ अधिवक्ता अॅड. विष्णू शंकर जैन उपस्थित असतील. ज्येष्ठ पत्रकार व लेखक सुधीर जोगळेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. कार्यक्रमादरम्यान दोन्ही अतिथींची मुलाखत होणार असून मूळ पुस्तकाच्या मराठी अनुवादक डॉ. प्राची जांभेकर त्यांची मुलाखत घेतील.

पुस्तकाविषयी थोडेसे...
*डॉ. विक्रम संपत यांच्या वेटींग फॉर शिवा : अनर्थिंग ट्रुथ ऑफ काशीज् ज्ञावनापी या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. प्राची जांभेकर आणि मैत्रेयी जोशी यांनी केला आहे.
*काशीचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व, वाड्मयातील स्थान आणि अर्थातच काशीवर झालेले धर्मांध हल्ले आणि तरीही काशीचे पुन्हा उभे राहणे, कायदेशीर लढाया या सर्वांचे विस्तृत वर्णन.
*शिवछत्रपतींनी काशी मुक्त झाली नाही याचे शल्य उरात बाळगून देह ठेवला.
*नंदी चारशे वर्षानंतरही आपले स्वामी पुन्हा प्रतिष्ठित होतील याची शांत संयमित प्रतीक्षा करीत आहे, त्याची ही गोष्ट.