मराठीत उलगडणार स्वातंत्र्याचा वीर इतिहास! जाणून घ्या कधी...

    28-Mar-2024
Total Views |
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट मराठीत ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
 

veer savarkar 
 
मुंबई : प्रखर राष्ट्रवादाचे कालातीत विचारधन निर्माण करुन कालजयी ठरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) हा हिंदी भाषेत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता हा चित्रपट मराठीत उद्यापासून म्हणजेच २९ मार्चपासून प्रदर्शित होणार आहे. सावरकरांवरील या भव्य चरित्रपटाच्या दिग्दर्शनाची दोरी हिंदी चित्रपटसृष्टीतील विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुड्डा याने लिलया हाती घेतली आहे. तसेच, या (Swatantryveer Savarkar) चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप त्याचा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकीय प्रवास देखील सुरु केला.
 
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना रणदीप म्हणाला होता की, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांची व्यक्तीरेखा साकारताना त्यांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा मी चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा साकारताना अनुभवली. देशासाठी त्यांनी जो संघर्ष केला तो जगासमोर आला पाहिजे याच अट्टहासामुळे मी या चित्रपटाचे दिग्दर्शक देखील करण्याचा निर्णय घेतला”.
 
रणदीप हुड्डा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी चित्रपटाला अभिनेता सुबोध भावे याने सावरकरांच्या व्यक्तिरेखेला आवाज दिला आहे. तसेच, या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज, आनंद पंडित, रणदीप हुड्डा, संदीप सिंह आणि योगेश राहर यांनी केली असून रुपा पंडित, सॅम खान, अनवर अली, पांचाली चक्रवर्ती यांनी सह निर्मिती केली आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्या प्रमूख भूमिका असणार आहेत.