'NMDC' अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे ट्रेड अॅप्रेंटिस म्हणून नोकरीची सुवर्णसंधी

    04-Feb-2024
Total Views |
National Mineral Development Corporation Recruitment 2024
 
मुंबई : 'नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती केली जाणार आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती संदर्भात 'नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून यासंदर्भात अधिसूचना, जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमधील (ट्रेड अॅप्रेंटिस) एकूण १२० विविध रिक्त पदे भरतीद्वारे भरली जाणार आहेत. या भरतीकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्जशुल्कासंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.

पदाचे नाव -

मेकॅनिक डिझेल (२५ जागा)

फिटर (२० जागा)

इलेक्ट्रिशियन (३० जागा)

वेल्डर (२० जागा)

मेकॅनिक मोटर व्हेईकल (२० जागा)

मशीनिस्ट (०५ जागा)


शैक्षणिक पात्रता -
 
संबंधित पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असेल.


'नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड'तील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे निवडण्यात येणार आहे.

थेट मुलाखतीकरिता पुढील दिवशी हजर राहायचे आहे.


मेकॅनिक डिझेल (२५ जागा) या पदाकरिता मुलाखत दि. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी होईल.

फिटर (२० जागा) या पदाकरिता मुलाखत दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी होईल.

इलेक्ट्रिशियन (३० जागा) या पदाकरिता मुलाखत दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी होईल.
 
वेल्डर (२० जागा) या पदाकरिता मुलाखत दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी होईल.

मेकॅनिक मोटर व्हेईकल (२० जागा), मशीनिस्ट (०५ जागा) या पदाकरिता मुलाखत दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी होईल.


भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी 'नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड'च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.