लवकरच बारामतीत उमेदवार उभा करेन - उपमुख्यमंत्री अजित पवार

    04-Feb-2024
Total Views | 30

Ajit Pawar


पुणे :
आगामी निवडणुकीसाठी लवकरच बारामतीचा उमेदवार जाहीर करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं आता माझं ऐका, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. रविवारी बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी जनतेला संबोधित केले.
 
अजित पवार म्हणाले की, "उद्याच्या काळात एकीकडे अजितदादा सांगतात तसं करा आणि दुसरीकडे वरिष्ठ सांगतात तसं करा अशा गंभीर समस्येतून तुम्ही जाणार आहात. पण माझी एवढीच विनंती आहे की, इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं आता माझं ऐका. इथून पुढे माझ्या विचारांचा खासदार झाला तर काय होणार आहे. मी खरं सांगतो माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांसोबत चांगले संबंध आहेत."
 
"ज्यावेळी खासदारकीच्या निवडणुका येतील तेव्हा महायुतीचा उमेदवार कोण आहे हे जाहीर करेन. पण मी स्वत: उमेदवार आहे असं समजून तुम्ही मतदान करायला हवं, ही माझी विनंती आहे. कुणी भावनिक होतील. कुणी म्हणतील आमची ही शेवटची निवडणुक आहे. पण खरंच ती शेवटची कधी होणार हे मला माहिती नाही. परंतू, तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी कळकळीची विनंती आहे. तुम्हाला कामाचं सातत्य टिकवायचं असेल तर माझ्या विनंतीला सहकार्य करा," असेही ते म्हणाले.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121