अबूधाबीमध्ये भारतीयांनी इतिहास रचला: नरेंद्र मोदी

    13-Feb-2024
Total Views | 52
Narendra Modi On Abu Dhabi

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ फेब्रुवारीपासून दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये पोहोचले आहेत. यूएईमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. दरम्यान, UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनीही पंतप्रधान मोदींना मिठी मारली. २०१४ पासून पंतप्रधान मोदींचा हा यूएईचा हा सातवा दौरा आहे. यावेळी पंतप्रधानांनी अबूधाबीतल्या मंदिराचा प्रस्ताव काही क्षणात मंजूर करण्यात आल्याचे ही सांगितले. त्यामुळे अबूधाबीमध्ये भारतीयांनी इतिहास रचवला, असे गौरवउद्धगार पंतप्रधानांनी काढले.

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी बैठक घेतली.या महत्त्वाच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी अबुधाबीमध्ये 'अहलान मोदी' या सामुदायिक कार्यक्रमात भारतीयांना संबोधित केले. अहलान मोदीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ६५ हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. कार्यक्रमाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये ७०० हून अधिक सांस्कृतिक कलाकारांचे प्रदर्शन समाविष्ट आहे.
 
या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी अबू धाबी येथील बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील. या मंदिराबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, अबूधाबीतल्या मंदिराचा प्रस्ताव काही क्षणात मंजूर करण्यात आला. त्यासाठी शेख मोहम्मद बिन झायेद यांचे आभार. तसेच यूईए भारताचा तिसरा मोठा गुंतवणुकदार देश आहे, असे ही पंतप्रधान यावेळी म्हणाले.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121