जाणून घ्या, आता 'या' देशातसुध्दा चालणार भारताचे ‘युपीआय’

    12-Feb-2024
Total Views | 81
PM Narendra Modi Inaugurates UPI service

नवी दिल्ली :
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासोबत संयुक्तपणे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) सेवांचे आणि मॉरिशसमधील रुपे कार्ड सेवांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्‌घाटन केले.

याप्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, भारत, श्रीलंका आणि मॉरिशस या तीन मित्र राष्ट्रांसाठी आजचा दिवस विशेष आहे ज्यावेळी त्यांचे ऐतिहासिक संबंध आधुनिक डिजिटल संबंधांचे रूप घेत आहेत. लोकांच्या विकासाप्रति असलेल्या सरकारच्या बांधिलकीचा हा पुरावा आहे, असे त्यांनी सांगितले. फिनटेक संपर्कव्यवस्था सीमेपलीकडील व्यवहार आणि संबंधाना अधिक बळकटी देईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारताचे यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच युपीआय आता एक नवी जबाबदारी पार पाडत आहे. भारतासोबत भागीदार जोडत आहे” यावर पंतप्रधानांनी भर दिला.

श्रीलंका आणि मॉरीशस या देशांनी युपीआय व्यवस्थेशी जोडून घेतल्यामुळे त्यांना लाभ होईल आणि त्यांच्या डिजिटल कायापालटाला चालना मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्थांमध्ये सकारात्मक बदल घडून येतील तसेच पर्यटनाला चालना मिळेल याबाबत पंतप्रधान मोदी यांनी विश्वास व्यक्त केला. श्रीलंका आणि मॉरीशसमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना तसेच तेथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या प्रणालीचा विशेष लाभ होईल, ते पुढे म्हणाले.नेपाळ, भूतान, सिंगापूर, आणि आखाती देशांपैकी संयुक्त अरब अमिरात या देशानंतर आता आफ्रिकेत मॉरीशस रुपे कार्डाचे परिचालन सुरु होत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
 
ग्लोबल साऊथच्या सहकार्याचे प्रतीक

युपीआय सेवेचे उदघाटन हे ग्लोबल साऊथ सहकार्याच्या यशाचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आमचे संबंध केवळ व्यवहारापुरते सीमित नसून तो ऐतिहासिक ऋणानुबंध आहे यावर भर दिला. गेल्या दहा वर्षांत भारताने आपल्या शेजारी मित्रराष्ट्रांना सदैव सहकार्याचा हात दिल्याकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, नैसर्गिक आपत्ती असो, आरोग्याशी संबंधित समस्या असो, आर्थिक असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील समर्थन असो, संकटाच्या प्रत्येक वेळी भारत आपल्या मित्रराष्ट्रांच्या पाठीशी उभा राहतो, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121