सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, विविध रिक्त पदांकरिता भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर माहिती

    12-Feb-2024
Total Views |
Cochin Shipyard Limited Recruitment 2024

मुंबई :
कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) अंतर्गत विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून 'कोचीन शिपयार्ड लिमिटेड'मधील विविध रिक्त पदांवर काम करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एनडीए अंतर्गत होणाऱ्या भरतीद्वारे अधिसूचनेत प्रस्तावित असणाऱ्या विविध पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 'सीएसएल'मधील रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्जशुल्कासंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.

पदाचे नाव -

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी(०१ जागा)
सहाय्यक अभियंता(०१ जागा)
लेखापाल(०१ जागा)

शैक्षणिक पात्रता -

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लेखापाल या पदांकरिता पदवीधर
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी विषयात पदवीधर

वेतनश्रेणी -

२८,०००-१,१०,००० रुपये.

वयोमर्यादा -

कमाल ४५ वर्षे

'कोचीन शिपयार्ड लिमिटेड'मधील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून दि. ०५ मार्च २०२४ असेल.
भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी 'कोचीन शिपयार्ड लिमिटेड'च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.