देशाच्या एकतेला सुरूंग लावणाऱ्या मोहम्मद झुबेर विरोधात एफआयआर दाखल!

    28-Nov-2024
Total Views |

zuber

लखनऊ : तत्तकालीन सरकार वर अश्लाघ्य भाषेत टिका करणाऱ्या मोहम्मद झुबेरला आता अखेर शासन होणार आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाला सांगितले की त्यांनी तथाकथित फॅक्ट चेकर मोहम्मद झुबेरवर भारताची एकतेला आणि अखंडतेला हानी पोहोचवण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. झुबेरच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यूपी पोलिस अधिकाऱ्याने माध्यमांना ही माहिती दिली आहे.

यूपी पोलिसांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, मोहम्मद जुबेरविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कलमे समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, पुराव्यांशी छेडछाड करणे आणि मानहानीसह धार्मिक भावना दुखावण्याशी संबंधित आहेत. त्यात आयटी कायद्याची कलमेही जोडण्यात आली आहेत. हे प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत दिले होते. पोलिसांनी बुधवारी (२७ नोव्हेंबर २०२४) न्यायालयात हे प्रतिज्ञापत्र सादर केले. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी मोहम्मद जुबेरने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.सदर एफआयआर उदिता त्यागी यांनी मोहम्मद जुबेरविरोधात दाखल केली आहे. जुबेरवर डासना मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांचा जुना व्हिडिओ शेअर करून मुस्लिम जमावाला भडकावल्याचा आरोप आहे. या व्हिडिओमध्ये यती नरसिंहानंद यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर दसना मंदिराबाहेरकाही कट्टरपंथीयांनी गोंधळ घातला होता. अनेक ठिकाणी ‘सर तन से जुदा'च्या घोषणा देण्यात आल्या. या हल्ल्यांमध्ये अनेक पोलीस जखमीही झाले आहेत. याप्रकरणी मोहम्मद जुबेरवर कारवाई करण्याची मागणी यती नरसिंहानंद सरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्षा उदिता त्यागी यांनी केली आहे.