मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Indresh Kumar Waqf Board) "देशातील वक्फ बोर्ड माफियांप्रमाणे चालत असून ते भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे. असे एक मत मुस्लिम समाजात वाढत आहे ", असे म्हणत मुस्लीम राष्ट्रीय मंचचे संरक्षक डॉ. इंद्रेश कुमार यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाचे समर्थन केले आहे. इंडियन एक्सप्रेसला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. वक्फ दुरुस्ती विधेयकाचे उद्दिष्ट केवळ वक्फ बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे हे आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
वक्फ बोर्डाच्या कामकाजाबाबत बोलताना पुढे ते म्हणाले, "या देशात जमिनीशी संबंधित कोणताही वाद न्यायालयांद्वारे ठरवला जातो, परंतु जेव्हा वक्फ मालमत्तेशी संबंधित विवाद येतो तेव्हा वक्फ बोर्ड हा एकमेव मध्यस्थ असतो. बोर्डाने तुमच्या विरोधात निर्णय घेतल्यास, तो अंतिम शब्द आहे आणि परिणामी अनेक मालमत्ता अयोग्यरित्या ताब्यात घेतल्या गेल्या आहेत. त्यामुळे वक्फ बोर्ड हे माफियासारखे काम करत आहे आणि भ्रष्टाचाराचे केंद्र बनत आहे, असे एक मत मुस्लिम समाजात वाढत आहे."
विधेयकाच्या समर्थनार्थ त्यांनी भारतीयांना आवाहन केले आहे. ते म्हणाले, “याविषयी अधिक जागरूकता असली पाहिजे आणि लोकांना संसदीय समितीकडे त्यांचे अभिप्राय देण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. काही लोक विधेयकाच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचे खोटे उघड झाले पाहिजे. लोकांना सांगितले पाहिजे की त्यांचा उद्देश तुम्हाला व्होट बँकेच्या राजकारणासाठी गुलाम बनवणे आहे"