'ऑल द बेस्ट' येतंय! ३० वर्षांनी पुन्हा नवोदित कलाकारांचा संच घेऊन रंगभूमीवर नाटक खणखणीत वाजणार

"ऑल द बेस्ट" नाटकाला "ऑल द बेस्ट"; २ फेब्रुवारीपासून रंगभूमीवर सज्ज, देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित "ऑल द बेस्ट"मध्ये झळकणार तीन नवे चेहरे; मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील रंगभूमी गाजवणार

    25-Jan-2024
Total Views | 64

all the best natak 
 
मुंबई : मराठी रंगभूमीवर खणखणीत वाजलेलं व गाजलेलं नाटक म्हणजे देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’. देवेंद्र पेम लिखित ही एकांकिका ९०च्या दशकाच्या सुरुवातीला विशेष गाजली. ३१ डिसेंबर १९९३ला या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग झाला. तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि रंगभुमीवर मोठा इतिहासचं घडवला.
 
या नाटकाने शेकडो तगडे स्टार इंडस्ट्रीला दिलेच पण भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर हे सूपरस्टार सुध्हा दिले. श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, जितेंद्र जोशी, दीपा परब, सुहास परांजपे, राजेश देशपांडे, संतोष मयेकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी या नाटकातून करिअरची सुरुवात केली.
 
मुका, बहिरा व आंधळा अशा मित्रांची कथा असलेलं हे धमाल नाटक रसिकांनी न भूतो अस उचलून धरलं. नाटकाच्या प्रयोगांचा ओघ एव्हढा प्रचंड होता की एकाच वेळी तीन टिम्स 'ऑल द बेस्ट'चे प्रयोग करत होते. दर महिन्याला साठ ते सत्तर प्रयोग व्हायचे. नाटकाच्या पहिल्या पाच वर्षात तब्बल २१०० प्रयोग झाले.
 
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल देशपांडे यांनी या नाटकाची तारीफ करत देवेंद्र पेम यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. 'ऑल द बेस्ट'ने केवळ मराठीचं नाही तर विविध भाषीक प्रेक्षकांनाही अक्षरशः वेड लावलं. त्यामुळे हे नाटक आजवर १२ भाषांमध्ये प्रदर्शित झालं असुन त्याचे जवळ जवळ १०००० प्रयोग झाले आहेत. या नाटकाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. ती लक्षात घेऊन हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालायला सज्ज होणार आहे. नव्या दमाच्या मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील व रिचा अग्निहोत्री या कलाकारांनी नाटकाची जोरदार तालीम सुरु केली आहे.
 
नाटकाचे लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम म्हणाले की, "या नाटकावर मराठी रसिकांनी अपार प्रेम केलं. त्यांना हे नाटक पुन्हा पाहायला निश्चित आवडेल. गेल्या १५-२० वर्षात आलेल्या नव्या पिढीला 'ऑल द बेस्ट' नाटकाचं नाव माहीत आहे. त्यांनाही हे विश्वविक्रमी नाटक पाहता यावं आणि या नाटकाचा आस्वाद घेता यावा म्हणून आम्ही हे नाटक नवपिढीसाठी घेऊन येत आहोत". 'अनामय' नाट्यसंस्थेची निर्मिती असणाऱ्या या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग २ फेब्रुवारीपासून रंगणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वसई-विरार महापालिका कार्यक्षेत्रात अवैध वैद्यकीय व्यवसायिक प्रॅक्टीस करीत असल्याबाबत तोंडी माहिती प्राप्त झाल्याने अशा अवैध वैद्यकीय व्यवसायीकांपासून नागरीकांच्या जीवितास हानी पोहचण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने दि. २५ जुलै २०२५ रोजी चिंचोटी नाका, कामण परिसरात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राजेश चौहान, आर.सी.एच. अधिकारी डॉ. स्मिता वाघमारे, पीसीपीएनडीटी अधिकारी डॉ. पूजा गुप्ता, वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास दूधमल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नाईकनवरे आणि वैद्यकीय आरोग्य विभागा..

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातीलअस्नोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, पोटच्या तीन सख्ख्या मुलींना विष घालून हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. काव्या (वय १०), दिव्या (वय ८) आणि गार्गी भेरे (वय ५) अशी मृत झालेल्या मुलींची नावे असून, संध्या संदीप भेरे (रा. चेरपोली) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात तिन्ही मुलींच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आईला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121