ऑनलाईन खरेदीदारांसाठी मोठी बातमी; 'अॅमेझॉन'कडून १९ सप्टेंबरनंतर २ हजारांच्या नोटांची कॅश डिलिव्हरी बंद

    14-Sep-2023
Total Views |
Restriction On Amazon cash on delivery

मुंबई :
ऐन गणशोत्सवाच्या मुहूर्तावर ई-कॉमर्स व्यवसायातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनने कॅश ऑन डिलिव्हरीवर २००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याबाबत अपडेट जारी केले आहे. सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून विविध ऑफर किंवा किंमतीत सवलत दिली जाते. त्यामुळे ग्राहक वस्तू खरेदीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना पसंती देतात. त्यातच आता अॅमेझॉनकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून दि. १९ सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटांची कॅश डिलिव्हरी घेणार नाही.

दरम्यान, अॅमेझॉनकडून जारी करण्यात आलेल्या अपडेटमध्ये दि. १९ सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटांची कॅश डिलिव्हरी घेणार नाही. मात्र 'UPI' पेमेंट करता येणार आहे, अशी घोषणा अॅमेझॉन डिलिव्हरी कंपनीने केली आहे. तसेच, अॅमेझॉनकडून १९ सप्टेंबरपासून कॅश ऑन डिलिव्हरी (COD) पेमेंट आणि कॅशलोड म्हणून २ हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद करतील, असे 'अॅमेझॉन'कडून स्पष्ट करण्यात आले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.