मुंबई : सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर दोन गटांत राडा झाला. यावर खासदार संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. निवडणुकीआधी राज्यासह देशभरात दंगली घडवू शकतात. असं संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत. साता-यात दंगलसदृश्य परिस्थिती का निर्माण झाली? हे सरकारचं अपयश आहे. असंही राऊत म्हणाले.
मराठा आरक्षणावर आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, "सरकारनं जालन्यात जावं. मनोज जरांगे पाटलांवर उपोषण करण्याची ही परिस्थिती का आली? त्यासाठी ईडी सीबीआय उपयोगी पडणार नाही. आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काय अर्थ आहे? काल G- 20 साठी दिल्लीत होते. आज भीमाशंकरला आहेत. ते तीर्थयात्रेतच व्यस्त आहेत. जंत्र, तंत्र, मंत्र जादू टोना यातच ते अडकलेले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे."
ठाकरे गटाचे उपनेते बबन घोलप यांनी आपला राजीनामा उद्धव ठाकरेना व्हॉट्सअप केला. यावर राऊत म्हणाले, "गेल्या 50 वर्षांपासून ते निष्ठावंत सैनिक आहेत. नाशिकमधले निष्ठावंत सैनिक आहेत. तुम्ही ज्या बातम्या दाखवताय. शेवटी निर्णय पक्ष प्रमुखांचा असतो. त्यांना उमेदवारी दिली होती. पण काही कारणास्तव त्यांना माघार घ्यावी लागली. यंदा पुन्हा त्यांच्या नावाचा विचार होणार होता. भाऊसाहेब वाकचौरेंनी प्रवेश केला म्हणजे त्यांना उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्या नाराजीचं कारण काय? घोलप कुटुंबाला सतत काही ना काही मिळत आलं आहे." असं संजय राऊत म्हणाले.