मुंबई: अनाथांची माय झालेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित मालिका लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची ही मालिका १५ ऑगस्टपासून संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होईल. अलीकडेच या मालिकेचा प्रोमो समोर आला असून यामध्ये सिंधुताई आणि चिंधी यांच्यातील संवाद दाखवण्यात आला आहे. चिंधी अर्थात लहानपणीच्या सिंधुताई.
दरम्यान या प्रोमोमध्ये सिंधुताई कोण साकारणार आहेत ही माहिती गुलदस्त्यात ठेवली असली तरी सिंधुताईना ज्या अभिनेत्रीने सिंधुताईंना आवाज दिला तिने सोशल मीडियावर प्रोमो शेअर करत सिंधुताईंना आवाज देताना झालेला आनंद व्यक्त केला. लोकप्रिय डबिंग आर्टिस्ट म्हणून नावाजलेल्या मेघना एरंडेने सिंधुताईंचा हा आवाज डब केला आहे. मेघनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त आहे. मेघना लिहिते की, 'माझं अहो भाग्य की मला माननीय पद्मश्री सिंधुताई ह्यांना डब करण्याची सुवर्ण संधी मिळली.
"सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" या मालिकेत सिंधुताईंची भूमिका कोण साकारणार आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटामध्ये सिंधुताई यांचा प्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटात तेजस्विनी पंडितने सिंधुताई यांची भूमिका साकारली होती. आता "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" या मालिकेच्या माध्यमातून सिंधुताई यांच्या बालपणाची गोष्ट पाहण्यास प्रेक्षक उत्सुकत आहेत.