एक डॉट बॉल पर्यावरण संवर्धनाचा !

    24-May-2023
Total Views | 61
ipl match new dot ball graphics

मुंबई
: जगभरात पर्यावरण संवर्धनाचा विषय गंभीर होत चालला असताना क्रिकेट विश्वातदेखील याविषयी जनजागृती होताना पाहायला मिळत आहे. सध्या बीबीआयकडून आयपीएल मोसम सुरू आहे. उपांत्यपूर्व सामन्यांची चर्चा होताना दिसून येत आहे. त्यातच आता बीबीआयने एक नवा निर्णय जाहीर केला आहे, तो ही पर्यावरणासंबंधित आहे. आयपीएलमध्ये दि. २३ मे रोजी पहिला क्वालिफायर सामना खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईने गतविजेत्या गुजरातचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. हा सामना सुरू असताना प्रत्येक डॉट बॉलवर झाडाचे ग्राफिक्स दाखवले गेल्याचे पाहायला मिळाले. या मागचे कारण आता समोर आले असून प्रत्येक डॉट बॉलवर ५०० झाडे लावणार आहे. त्यामुळे प्रत्येक डॉट बॉलवर झाडाची चित्र पाहायला मिळत होते.

दरम्यान, आयपीएलचे आणखी दोन सामने होणार आहेत. पुढील सामना हा लखनऊ आणि मुंबई यांच्यात खेळवला जाणार आहे. तर अंतिम सामना हा दि. २८ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवला जाणार आहे. उर्वरित दोन सामन्यांतही याचा उपयोग होण्याची चिन्हे आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121