चांद्रयान-३ साठी सज्ज व्हा... इस्रोने प्रक्षेपण आणि लँडिंगची तारीख केली जाहीर!

    22-May-2023
Total Views |
know-all-about-chandrayaan-3-when-it-will-be-launched-landing-date-on-moon-isro


नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) लवकरच देशाच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेअंतर्गत चांद्रयान-३ प्रक्षेपित करणार आहे. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. चांद्रयान-३ यावर्षी १२ जुलै रोजी प्रक्षेपित होणार असून ते २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाची माहिती देण्यासाठी इस्रो स्पेस फ्लाइटने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “लाँचिंगची तारीख समोर आली आहे. १२ जुलै २०२३ रोजी, GSLV Mk-III रॉकेट श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-३ अंतराळयान प्रक्षेपित करेल. ते २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल.
 

22 May, 2023 | 14:34
 
तसेच एका वृत्तपत्रानुसार, चांद्रयान-३ यूआर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये आहे. येथे त्याच्या पेलोडची अंतिम असेंब्ली होणार आहे. यापूर्वी या वर्षी मार्चमध्ये शास्त्रज्ञांनी चांद्रयान-३ च्या सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण केल्या होत्या. या चाचणीत चांद्रयान-३ प्रक्षेपणाच्या वेळी वातावरणातील तीव्र कंपने आणि बदलांवर पूर्णपणे खरे उतरले आहे.चांद्रयान-३ या मिशनमध्ये अनेक उपकरणे घेऊन जाईल.



ही उपकरणे भूकंप, प्लाझ्माचे थर्मल-भौतिक गुणधर्म आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील मूलभूत रचना यांचा अभ्यास करण्यास मदत करतील. चंद्राच्या पृष्ठभागासाठी आणि इतर तपासासाठी तेथे जाणारे अंतराळ यान देशातील सर्वात मजबूत प्रक्षेपण वाहन GSLV Mk-३ द्वारे प्रक्षेपित केले जाईल. चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून होणार आहे. मोठी गोष्ट म्हणजे चांद्रयान-३ हे अवकाशयान, प्रणोदन, लँडर आणि रोव्हर या तिन्ही यंत्रणा एकत्र करून तयार करण्यात आले आहे.


22 May, 2023 | 14:35



चांद्रयान-२ च्या चुका होणार नाहीत
 
इस्रोच्या शास्त्रज्ञांना कोणतीही चूक पुन्हा करायची नाही. त्यासाठीची पूर्ण तयारी जोरात सुरू आहे. खरं तर, चांद्रयान-२ मध्ये उतरण्यापूर्वी लँडरचा संपर्क ४०० मीटरवर तुटला होता. मात्र, यावेळी अशी काही चूक होण्याची शक्यता नाकारली जात आहे. खरं तर, चांद्रयान-३ च्या लँडिंग तंत्रात वैज्ञानिकांनी मोठा बदल केला आहे. यामध्ये बहुतांश कार्यक्रम स्वयंचलित करण्यात आले आहेत.

22 May, 2023 | 14:37


एवढेच नाही तर लँडिंगसह इतर कामांसाठी चांद्रयान-३ मध्ये शेकडो सेन्सर बसवण्यात आले आहेत. हे सेन्सर्स लँडरला लँडिंगच्या वेळी उंची, लँडिंगची जागा, वेग आणि लँडरला खडकांपासून कसे वाचवायचे हे जाणून घेण्यास मदत करतील. चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर ७ किमी उंचीवरून लँडिंग सुरू करेल. यानंतर, त्याचे स्वयंचलित सेन्सर २ किमी उंचीवर पोहोचताच काम करण्यास सुरवात करतील.


22 May, 2023 | 14:36







22 May, 2023 | 14:41


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.