मुंबईची ‘लाईफलाईन’ होणार ‘हायटेक’ ; अत्याधुनिक ‘वंदे मेट्रो’ लोकल धावणार
21-May-2023
Total Views |
मुंबई : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली लोकल सेवा येत्या काळात कात टाकणार असून, अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त हायटेक वंदे मेट्रो लोकल लवकरच मुंबईत धावणार आहे. रेल्वे बोर्डाने नुकतीच रेल्वे विकास महामंडळाच्या ‘एमयुटीपी’ प्रकल्पातर्गत २३८ वंदे मेट्रो लोकल बांधणीला मंजुरी देण्यात आली आहे.
वंदे मेट्रो लोकल निर्मितीसाठी सुमारे २० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार आहे.
दरम्यान, ‘मेड इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘वंदे भारत’ ट्रेनपाठोपाठ रेल्वे बोर्डाने वंदे भारत मेट्रो ट्रेनची बांधणी सुरू केली आहे. या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत वंदे मेट्रो ट्रेन प्रवाशांचा सेवेत दाखल होतील. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दि. १ फेब्रुवारी रोजी शहरांतर्गत प्रवासासाठी वंदे मेट्रो संकल्पना जाहीर केली होती. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. वंदे मेट्रो उपनगरी लोकल सेवा म्हणून चालवण्यात येणार आहेत. वातानुकूलित वंदे मेट्रो लोकलचा देखभालीसाठी मुंबई महानगर प्रदेशात दोन नवीन कारशेड उभारण्यात येणार असून, यासाठी जागेची निश्चिती केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.