सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बेस्टच्या ताफ्यातल्या ई- बसेसची संख्या वाढणार

    19-May-2023
Total Views |
E Bus

मुंबई
: मागच्या वर्षी बेस्ट प्रशासनाने २१०० सिंगल डेकर बसचा करार टाटा मोटर्सने घेतलेल्या आक्षेपामूळे रखडला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य ठरवल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या ऑलेक्ट्रा आणि इव्हे ट्रान्सच्या इ बसेस आता बेस्टच्या ताफ्यात येणार असल्याने ई-बसेसची संख्या वेगाने वाढेल. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी यावर निर्णय दिला त्यात उच्च न्यायालयाची परत निवीदा मागवण्याची सुचना बाजूला ठेवत बेस्ट प्रशासनाची १४०० बसेस साठीच्या कंत्राटदाराची निवड प्रक्रिया योग्य ठरवली. या नुसार इव्हे ट्रान्सला मिळालेला १४०० सिंगल डेकर बसचा करार योग्य ठरला आहे. या बरोबरीने अजून ७०० सिंगल डेकर बसची मागणी देखील त्यावेळेस बेस्टने इव्हे ट्रान्सला दिली होती. त्यामूळे एकूण २१०० वातानूकुलीत, अत्याधूनिक इ बसेस आता बेस्टच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील.

जुन्या डिझेल बसेस या पर्यावरणीय नियमावली नुसार, सेवेतून बाद होत असल्याने बेस्ट ताफ्यात मागच्या काळात बसेसचा तुटवडा जाणवत होता. त्यामूळे प्रवाशांसाठी दोन बसेस दरम्यानचा प्रतिक्षा कालावधी सुध्दा वाढला होता. नविन बसेस सेवेत दाखल होणार असल्याने बेस्टच्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळेल. शिवाय या बसेस पर्यावरण पूरक तसेच आवाज रहित आणि वातानूकुलीत आहेत तसेच त्या भाडेतत्वावर असल्याने त्यासाठी भांडवली खर्च बेस्ट प्रशासनावर येणार नाही त्यामूळे आर्थिक बोजा न घेता बेस्ट आपल्या ताफ्यातील बसेसची संख्या वेगाने वाढवू शकेल. तसेच यावरिल चालक आणि त्यांची देखभाल व विजेचा खर्च हा कंत्राटदाराने करायचा असल्याने बेस्टच्या प्रति किलोमीटर होणाऱ्या खर्चात देखील बचत होईल.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.