तुळजापूर : तुळजापूर मंदिरामध्ये तोडके कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी केली आहे. मंदिरात असभ्य कपडे घातल्यास वस्त्र घातल्यास मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. कोणी कोणते कपडे घालावे, याचे व्यक्तिस्वतंत्र सर्वांना आहे, अशी प्रतिक्रिया भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे. सहा वर्षाच्या मुलाचे कपडे असभ्य कसे असतील असा प्रश्न भाविकांनी उपस्थित केला आहे. भाविकांच्या भक्तीकडे आपण पाहिले पाहीजे त्याच्या कपड्यांकडे नाही. तुळजापूर संस्थानने लावलेला बोर्ड संविधानाचा अपमान आहे. तातडीने हा बोर्ड काढावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.