घोडबंदर रोडचे नाव 'वीर चिमाजी आप्पा मार्ग' करा

    16-Mar-2023
Total Views |

ghodbanr 
 
मुंबई : भाईंदर वसई खाडीजवळील महामार्गजवळ घोडबंदर रोड या मार्गाचे नाव बदलून वीर चिमाजी आप्पा मार्ग करा अशी मागणी अभिनेते मुकेश खन्ना यांनी केली आहे. इसवी सन १७०० च्या कालखंडात चिमाजी आप्पानी या परिसरात महत्वाचे कार्य बजावले होते. वसईची मोहीम घेताना पोर्तुगीजांशी संघर्ष करताना सैन्याची ने आण याच मार्गाने होत असे. ९ वेळा पोर्तुगीजांवर आक्रमण करून त्यांनी वसईला पोर्तुगीजांपासून वाचवले. पोर्तुगीज जनतेवर अत्याचार करीत ख्रिस्त धमाचा प्रसार करत होते. चिमाजी आपच्या कामगिरीमुळे धर्म टिकून राहिला. आणि म्हणूनच या मार्गाला वीर चिमाजी अप्पा मार्ग असे नामकरण करावे अशी मागणी मुकेश यांनी संग्राम फाउंडेशनच्या मदतीने ठाण्याचे अध्यक्ष अभिजित यांच्याकडे केली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.