मोठे कलाकार वळवतायेत ओटीटीकडे मोहरा

    10-Mar-2023
Total Views |

ott 
 
मनोरंजन क्षेत्रात ओटीटीचा शिरकाव झाला आणि त्याचे महत्व लक्षात न घेता अनेक नामवंत कलाकारांनी त्याकडे पाठ फिरवली. पण गेल्या काही वर्षात हेच मोहरे ओटीटी कडे मोठ्या प्रमाणावर वळताना आपल्याला दिसतात. साधारणपणे २ दशके इंडस्ट्रीत काम केल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर त्याची फर्जी सिरीज ओतितीवर घेऊन येतो. बॉलिवूडच्या चित्रपटांचा ठरलेला एक साचा आहे. त्या साच्याप्रमाणेच कथानकं लिहिली जातात, कलाकारांना पुरेसे स्वातंत्र्य घेता येत नाही.. असे अनेक कंगोरे आहेत. त्यातील काही ठराविक कंगोरे अधोरेखित करण्याचा प्रयत्न..
 
विदेशातील प्रेक्षक वर्ग
बहुतेकदा असे दिसून येते, मोठ्या पडद्यावर झळकलेले आणि नाव कमावलेले कलाकार पुन्हा लहान स्क्रीनवर जात नाहीत. चित्रपटांतून काम केल्यानंतर नाटकं, शॉर्ट फिल्म्स याकडे पाठ फिरवलेले कलाकार अनेक आहेत. परंतु कोरोना महामारीनंतर ज्या कलाकारांनी ओटीटीकडे पाठ फिरवली होती तेच पुन्हा या माध्यमातून काही प्रयोग करताना दिसतात. त्यामागचे कारण म्हणजे ओटीटी माध्यमांवरील प्रेक्षकवर्ग फक्त भारतापुरता मर्यादित न तर विदेशातूनही कन्टेन्ट पहिला जातो. एका सर्वेक्षणातून असं दृष्टीस आलं आहे की विदेशातून भारत निर्मित मजकुराला मोठी मागणी आहे.
 
इनहाऊस निर्मिती
ओटीटी माध्यमे स्वतःचा मजकूर तयार करतात, आणि त्यासाठी स्वतः निर्मिती करतात. चित्रपटांच्या बाबतीत असे हो नाही, दिग्दर्शक वेगळा दृष्टिकोन घेऊन येतो, निर्माते आपापले म्हणणे स्वतंत्रपणे मांडत असतात. अशातच सेन्सर बोर्डाचा विचार करून कलाकारांना वाटेल मर्यादित स्वातंत्र्य नाही तर मर्यादाच येतात. अशावेळी अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स उत्तम मजकूर असलेल्या मालिकांची निर्मिती करत आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.