पोपट मियाँ सलीम यांना माझं खुलं चॅलेंज! कम्बोज यांची राऊतांवर टीका
21-Nov-2023
Total Views | 131
मुंबई : मोहित कम्बोज यांनी खासदार संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं आहे. संजय राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्वीट केला होता. त्यानंतर राऊतांनी २७ फोटो अन् ३ व्हिडीओ असल्याचा दावा केला होता. यावर आता कम्बोज यांनी राऊतांना खुलं आवाहन दिलं आहे.
मोहित कम्बोज ट्विटद्वारे म्हणाले, "महाराष्ट्राचे पोपट मियाँ सलीम संजय राऊतचं आवाहन देत आहे की, तुम्ही म्हणत होता तुमच्याकडे चंद्रशेखर बावनकुळे यांचे २७ फोटो अन् ३ व्हिडीओ आहेत. पोपट मियाँ सलीम संजय राऊत तुम्ही जर खरे मर्द असाल तर, १ फोटो अन् १ व्हिडीओ टाकून दाखवावा." असं मोहित कम्बोज यांनी म्हटलं आहे.